Soybean cultivation in Rabbi 
पश्चिम महाराष्ट्र

कुरळप : रब्बीत सोयाबिन लागवडीचा धडाका

कुरळप परिसरात बदललेल्या वातावरणात झटपट आर्थिक लाभाचे गणित

सकाळ वृत्तसेवा

कुरळप : खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या सोयाबीनची लागवड येथील परिसरात यंदा रब्बीत जोरदारपणे सुरू आहे. वातावरणातील बदल, इतर पिकांच्या उत्पादनांना कमी होत असलेली मागणी, ऐनवेळी झालेला पाऊस अन् सोयाबीनच्या लागवडीतून झटपट मिळणारा लाभ यांची गणिते मांडून ऊस उत्पादक सोयाबीनकडे वळलेत.

ऊस उत्पादनाबाबत सरस असणारा कुरळप परिसर यापूर्वी आडसाली ऊस व खोडवा कारखान्याच्या गळीत हंगामाच्या सुरुवातीस घालवून नंतर मका, गहू, हरभरा, सूर्यफूल आदी पिके घेत असे. काही शेतकऱ्यांनी खोडवा लवकर गेल्यानंतर भोपळ्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतले. काहींनी टोमॅटो, पडवळ,कार्ली, काकडीसह पालेभाज्यांचे उत्पादन घेतले. यंदा वातावरणात बदल झाला. आणि तसेही गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत दरात चढ-उतार होत राहिले. बदललेले वातावरण व त्या अनुषंगाने बदलेल्या बाजारपेठांचा नूर अन् सलग दोन वर्षांपासून असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने यामुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले.

दोन वर्षात फळभाज्या तसेच फुलाच्या उत्पादनास कोरोनाच्या प्रादुर्भाव असल्याने मागणी कमी होती. पिकलेल्या पिकास बाजारपेठ उपलब्ध नव्हती. एक-एक रुपयांचा हिशोब ठेवत फळभाज्या पिकवल्या. वारेमाप खर्च केला, मात्र घातलेले पैसेही परत मिळविताना नकीनऊ झाले.

बाजारपेठ उपलब्ध नसल्याने स्वतः सर्वत्र फिरून पिकवलेला माल विकला होता. सर्व अडचणींवर मात करत शेतकरी यंदा परत रब्बी हंगामासाठी सज्ज झाला होता. नोव्हेंबर २०२१ मध्ये झालेल्या अवकाळीमुळे ऊस उत्पादकांचे ऊस शेतातून गेल्यानंतरचे वेळापत्रक पूर्णपणे बदलले आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी मोकळ्या जमिनीची मशागत करून सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात केली. सोयाबीनसह गहूही जोमदारपणे परिसरात डौलत आहे. काहींनी आडसाली ऊसाला पर्याय म्हणून शेत लवकर मोकळे झाल्याने ‘सुरु’ च्या लागणीही केल्या. रब्बीत केलेला सोयाबीन लागवड व सुरुच्या लागणीचा प्रयोग कितपत लाभदायक ठरतोय यावरून पुढील हंगामात पिकांचे गणित ठरणार आहे. यावेळी वातावरणात बदल झाला.

तो बदल सोयाबीन शेतीसाठी पोषक वाटला म्हणून एक एकर सोयाबीनची लागवड केली आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत कमीत कमी एक लाख रुपयांचे उत्पादन होईल, अशी अपेक्षा आहे. -भगवान देवकर, कुरळप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

Sachin Tendulkar: विनोद कांबळी सचिनपेक्षा खरंच भारी होता? भावानेच केला खुलासा; म्हणाला, 'तो असं कधीच...'

Dr. Trupti Agarwal: 'मुलं म्हणजे रिपोर्ट कार्ड नव्हे,' डॉ. त्रुप्ती अगरवाल यांचं नवं शैक्षणिक सूत्र

ST Bus conductor drunk : एसटी बसचा कंडक्टर दारूच्या नशेत धुंद; केबिनजवळ जाताच ड्रायव्हरनं...; पाहा VIDEO

Rain-Maharashtra Latest Live News Update: सीएसडीएसचे संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT