sangli crime sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Crime : एसपी कृष्णप्रकाश उतरले शिर शोधायला नदीत

सांगली बंधाऱ्याच्या काठोकाठ पाणी होतं. तत्कालीन पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश त्यात उतरून मृतदेहाचे शिर शोधत होते. एक-दोन नव्हे, तर तीन महिने तपास चालला.

सकाळ वृत्तसेवा

sp krishna prakash to search head of body in river sangli crime police

सांगली बंधाऱ्याच्या काठोकाठ पाणी होतं. तत्कालीन पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश त्यात उतरून मृतदेहाचे शिर शोधत होते. एक-दोन नव्हे, तर तीन महिने तपास चालला. अखेर कवटी मिळाली. शरीरशास्त्र विभागाच्या अहवालानंतर खुनाचा छडा लागला. ‘कानून के हाथ बहोत लंबे होते हैं..!’

याप्रमाणे सांगली पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपासाने खुनाचा छडा लावला. तीन महिन्यांनंतर एका नाजूक कारणातून झालेल्या खुनातील मृताची ओळख पडली. कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती नसताना खुनाचा उलगडा झाला. - शैलेश पेटकर

ही घटना आहे, सन २००८ ची. सांगलीतील खिलारे मंगल कार्यालयाच्या परिसरात एक मस्तक (शिर) नसलेले शरीर असल्याची माहिती शहर पोलिसांना रात्री साडेआठच्या सुमारास मिळाली. गुन्हे विभागाचे तत्कालीन सहायक निरीक्षक रविकिरण घोडके व पथक घटनास्थळी दाखल झाले. तिशीतील एका व्यक्तीचे केवळ धड असल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे खळबळ उडाली. तत्कालीन पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनीही नुकताच सांगलीचा पदभार स्वीकारला होता. तेही घटनास्थळी दाखल झाले. तपासाच्या सूचना दिल्या. प्राथमिक तपासात आकस्मिक मृत्यूची नोंद शहर पोलिसांत करण्यात आली. मृताची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी सर्व यंत्रणा कामी लावली.

कोणताही पुरावा हाती नव्हता. मग, मृताची कोणाकोणाशी ओळख होती, याचा पोलिसांनी शोध सुरू केला. यातून हाताला काही लागेल, असे पोलिसांना वाटलेच नव्हते. त्या वेळी सांगलीतील एका वडापाव विक्रेत्याचे नाव समोर आले.

पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली. तोवर अनेकांची चौकशी झाली होती. मात्र त्याच्या चौकशीत विसंगती आढळून आल्याने पोलिसांनी सखोल चौकशी केली. ‘पोलिसी खाक्या’ही दाखवलाच. त्यानंतर सारी हकिकत समोर आली.

मृत व्यक्ती हा रंगकाम करायची. सायंकाळी तो वडापाव खाण्यासाठी त्या गाड्यावर यायचा. त्यातून हल्लेखोरांशी त्यांची ओळख वाढली. मग, हल्लेखोराने घरी एके दिवशी जेवायला नेले. अगदी घसट वाढल्याने त्याच्याच घरी मृताने मेसही सुरू केली.

काही दिवस उलटले. संशयित हल्लेखोर हा सकाळी रिक्षा चालवायचा आणि सायंकाळी वडापाव विक्री करायचा. त्याच्यासमवेत भाचाही असायचा. दरम्यानच्या काळात मृताचे काही नाजूक संबंध समोर आले. ते भाच्याच्या निदर्शनास आले.

याच रागातून मृताचा काटा काढण्याचा कट रचला गेला. घटनेदिवशी त्याला बोलावून घेतले. निर्जनस्थळी नेत कांदा कापायच्या सुरीने त्याचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला. संशयितांनी शिर धडापासून वेगळं केले. शिर प्लास्टिकच्या पिशवीत भरून ते कृष्णा नदीत फेकलं. हे सारे आठव्या दिवशी पोलिस तपासात समोर आले.

मग, नदीत ते शिर शोधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. तत्कालीन अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी स्वतः मृताचे शिर शोधण्यासाठी कृष्णा नदीत उडी घेतली. दोन तास पाण्यात शोध घेतला, मात्र पाण्याला प्रवाह अधिक होता.

त्यामुळे पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. खुनाच्या गुन्‍ह्याचा छडा लागला, मात्र पोलिसांना अद्यापही शिर मिळत नव्हते. त्यामुळे तपासच फिरत होता. तीन महिन्यांनंतर म्हैसाळ बंधाऱ्याजवळ एक कवटी मच्छिमाराला दिसून आली. त्याने पोलिसांना कळवले. पोलिसांची टीम दाखल झाली.

कवटी घेऊन पोलिसांनी शरीरशास्त्र विभागाकडे पाठवली. त्या वेळी मृताची ओळख पटवण्यात आली. पोलिसांच्या हाती कोणतेही धागेदोरे नसतानाही गुन्ह्यातील एक-एक कड्या जुळवत संशयितांना गजाआड केले. मामा, भाच्याला अटक करण्यात आली. पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीची साऱ्यांनीच दखल घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : आजीबाईने डिलीट केले १२ व्होट..! अर्ज कोणी केला, काय म्हणाल्या गोडाबाई? राहुल गांधींनी समोर आणला 'घोळ'

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयुक्तांना १८ वेळा पत्र पाठवले, तरीही काहीही उत्तर मिळाले नाही

Asia Cup 2024 Super 4 Scenario : भारत, पाकिस्तान यांची जागा पक्की; अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांना काय करावं लागणार?

ज्ञानेश कुमार मतचोरांचं संरक्षण करतायत, मी पुराव्याशिवाय बोलत नाहीय : राहुल गांधी

iPhone Air! अ‍ॅपलचा कागदासारखा पातळ स्मार्टफोन; कुणी खरेदी करावा अन् कुणी अजिबात घेऊ नये? एकदा बघाच

SCROLL FOR NEXT