Space approved, funds in hand; The project stopped due to political infulances  
पश्चिम महाराष्ट्र

जागा मंजूर, निधीही हातात; कारभाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे प्रकल्प रखडला... काय चाललेय वाचा

सकाळवृत्तसेवा

सांगली : महापालिकेच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी जागा मंजूर आहे. पाच कोटींचा निधीही हातात आहे. फक्त दुसरी जागा पाहिजे या हट्‌टामुळे हॉस्पिटल गेले चार वर्ष रखडले. अन्यथा आज कोरोनाच्या संकटात महापालिकेचे हॉस्पिटल जनतेच्या सेवेसाठी कामी आले असते. 

राज्य शासनाच्या राष्ट्रीय शहरी अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रात मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाकडून पाच कोटी रुपयांचा निधीही महापालिकेला तीन वर्षांपूर्वीच प्राप्त झाला आहे. कुपवाडच्या नागरिकांसाठी सोयीचे व्हावे म्हणून प्रस्तावित हॉस्पिटल वारणालीतील विद्यानगर येथे उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्या जागेत हॉस्पिटलचा आराखडाही मंजूर करण्यात आला आहे. पण मंजूर जागेत हॉस्पिटल नको तर दुसऱ्या जागेत उभे करावे यासाठी कुपवाडच्या एका नगरसेवकाने आपली ताकद पणाला लावली. महापालिकेच्या मालकीच्या जागेत हॉस्पिटल उभारणीचा प्रस्ताव असतानाही खासगी जागा विकत घेण्याचा घाट घातला गेला. नागरिकांनी मंजूर जागेतच हॉस्पिटल करावे यासाठी कौल देऊनही त्याकडे दुर्लक्ष करून नवीन जागा घेण्याचा विषयही महासभेत मंजूर करून घेतला. पण, त्यापुढे काही हालचाल झाली नाही. आता पुन्हा कुपवाडमधील नगरसेवकांनी विद्यानगर येथील मूळ मंजूर जागेतच हॉस्पिटल उभारावे अशी मागणी केली आहे. 

30 ते 50 बेडचे हॉस्पिटल 
कॉंग्रेसची सत्ता महापालिकेत असताना हे हॉस्पिटल मंजूर झाले. कुपवाड गावठाणात हॉस्टिपलसाठी जागा उपलब्ध नसल्याने जवळच असलेल्या विद्यानगर परिसरातील 32 गुंठे जागा या निश्‍चित केली होती. त्याच्या जवळच आणखी 20 गुंठे जागा आरक्षित आहे. तेथे हॉस्पिटलच्या स्टाफसाठी क्वार्टर्स बांधण्याचा प्रस्ताव होता. या ठिकाणी हॉस्पिटल उभारण्याचा आराखडाही बनवण्यात आला. 30 ते 50 बेडचे हे हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, अस्थिशल्य चिकित्सक, जनरल फिजिशियन असे तज्ज्ञ डॉक्‍टर येथे नेमले जाणार आहेत. तसेच सोनोग्राफी, एक्‍स रे, एमआरआय सारख्या चाचण्यांचीही सोय केली जाणार आहे. 

नवीन जागेसही विरोध 
कुपवाडमधील एका नगरसवेकाने विरोध करून कुपवाड एमआयडीसी जवळच्या जागेत हॉस्पिटल करावे असा हट्‌ट धरला. त्यामुळे मंजूर हॉस्पिटल रखडले. भाजपच्या कारभाऱ्यांनीही आपल्याच नगरसेवकांचा विरोध डावलून नवीन जागेत हॉस्पिटल करण्यास मान्यता दिली. नवीन जागेचा ठरावही करण्यात आला. पण, जागेच्या खरेदीवरून या हॉस्पिटलला पुन्हा नवीन जागेत उभारण्यास विरोध चालू झाला असून जुन्या मंजूर जागेतच हॉस्पिटल व्हावे अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. ज्या नगरसेवकांनी नवीन जागेला पाठिंबा दिला होता त्यांनीच आयुक्तांना पत्रे देऊन जुन्या मंजूर जागेत हॉस्पिटल बांधण्याची मागणी केली आहे. 

गेले दीड वर्ष हॉस्पिटल रखडल्यामुळे आज कोरोनासारख्या महामारीच्या काळात सांगली आणि मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलवर ताण येत आहे. सदरचे हॉस्पिटल उभारले असते तर आज कोविड 19च्या उपचारासाठी त्याचा उपयोग करता आला असता. मात्र जनतेच्या सोयीपेक्षा स्वत:च्या सोयीच्या राजकारणामुळे एक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारता उभारता थांबले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : कर्जाच्या पैशातून मोदींचा केक कापणार? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आर्थिक गुन्हा, संजय राऊतांचे राज्य सरकारवर ताशेरे

Latest Marathi News Updates : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा

कलाकार हवा तर असा ! दशावतारचं यश पाहून हिंदी मीडियाने केलं दिलीप प्रभावळकरांचं कौतुक "बॉलीवूडला लाज वाटायला.."

Rahuri Accident: 'दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी'; दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

SCROLL FOR NEXT