E-Satbara
E-Satbara 
पश्चिम महाराष्ट्र

‘स्पेस’मध्ये रखडला ई-सातबारा

विशाल पाटील

सातारा - राज्यभरातील शेतकऱ्यांना ऑनलाइन सातबारा उतारा उपलब्ध करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रदिनी ऑनलाइन सातबारा मिळणार असे शासनाने जाहीर केले. मात्र, पुन्हा एकदा सर्व्हरवर ‘स्पेस’ (जागा) उपलब्ध नसल्याने ऑनलाइनच्या कामात अडचण वाढली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे, सातारा, कोल्हापूरमधील काही तालुक्‍यांचे पुनर्दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नसल्याने, तसेच सर्व्हरवर जागा उपलब्ध नसल्याने येथील सातबारा अद्यापही संगणकीकृत झालेले नाहीत.

राज्य शासनाने तीन वर्षांपासून सातबारा, फेरफार ऑनलाइन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. सातबारा उतारा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्याकडे हेलपाटे मारावे लागतात. गावापासून दूर राहणारे लोक सातबारा घेण्यासाठी गावाकडे गेल्यास कित्येकदा तलाठीच उपलब्ध नसतात. त्यामुळे त्यांना रिकाम्या हाती मागे फिरावे लागते. सातबारा उताऱ्यासाठी महसूल यंत्रणेकडून अडवणूक होऊ नये, यासाठी हे उतारे ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. गतवर्षी स्वातंत्र्यदिनी ही सेवा उपलब्ध होणार होती. मात्र, यंत्रणेला हे शक्‍य झाले नाही. पुन्हा एक जानेवारी, गुढीपाडव्याचाही मुहूर्त टळला. त्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रदिनी ऑनलाइन सातबारा उतारा देण्याची घोषणा केली. त्यादृष्टीने कामे वेगाने सुरू होऊन बहुतांश जिल्ह्यातील सातबारे आता ऑनलाइन मिळू लागले आहेत. 

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, हातकणंगले, सातारा जिल्ह्यातील सातारा, पाटण, खटाव, माण या तालुक्‍यांतील सातबारा अद्याप ऑफलाइन पद्धतीनेच दिले जात आहेत. सातारा, पाटण, खटाव तालुक्‍यांचे पुनर्दुरुस्तीचे (रिएडिट) काम पूर्ण झाले आहे, तर माणमधील अवघ्या दहा गावांचे काम बाकी आहे. परंतु, ऑनलाइन सातबाराच्या सर्व्हरवर जागा उपलब्ध नसल्याने ते ऑनलाइन करता येत नाहीत. त्यामुळे या तालुक्‍यांचे काम काही दिवस रखडणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचे राजस्थानसमोर 222 धावांचे लक्ष्य! फ्रेझर-मॅकगर्क, पोरेलचे अर्धशतक, तर स्टब्सची अखेरीस तुफानी फटकेबाजी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT