special article of dr ajit patil from sangli on the topic of corona vaccine caring in sangli 
पश्चिम महाराष्ट्र

लसीकरण आणि घ्यायची काळजी

डॉ. अजित पाटील

सांगली : विज्ञानाने काही व्याधींविरोधी लसी शोधल्या. ते व्याधींविरोधी कवच उपलब्ध झालेले आहे. जीवाणूमुळे होणाऱ्या व्याधींवर अनेक औषधे उपलब्ध असल्यामुळे ते व्याधी बरे करणे सोपे आहे. तथापि विषाणूंमुळे होणारे पोलिओ, एड्‌स, कोरोनासारख्या व्याधी औषधांमुळे बरे करणे अवघड आहे. म्हणून अशा विषाणुजन्य व्याधींसाठी लस परिणामकारक कार्य करेल, असे वाटते आहे. 

कोरोनाही विषाणुजन्यच व्याधी आहे. त्यावर सध्यातरी खात्रीशीर औषधे उपलब्ध नाहीत. म्हणूनच मग त्यासाठी जगात संशोधन सुरु झाले. वर्षभराच्या अथक प्रयत्नांमुळे आता देशोदेशीच्या शास्त्रज्ञांना लस तयार करण्यात यश आले आहे. या लसींबाबत मानवी शरीरावरील त्रिस्तरीय खडतर चाचण्या पार पडून लसींची अधिकाधिक उपयुक्तता आणि कमीतकमी उपद्रवमूल्यता साधण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. हे जेव्हा संबंधित यंत्रणांसमोर सिद्ध होते तेव्हाच शासकीय यंत्रणांकडून लस वापरण्यास मान्यता मिळत असते.

लस घेतल्यानंतर आपल्या शरीरात कोरोना विषाणूंविरोधी रोगप्रतिकारक शक्ती तयार होवून राहते. त्यामुळे,जर भविष्यात आपल्या शरीरात कोरोनाच्या विषाणूंचा संसर्ग झाला तर ही रोगप्रतिकारक यंत्रणा त्यांच्या विरोधी काम करु लागते. त्या परजीवी विषाणूंचा नाश करण्यात यश येवून आपण कोरोना पासून बचावू शकतो. आपल्याकडेही ते सुरु झाले आहे. 
टप्प्या टप्प्याने लसीकरणाचे सार्वत्रिकरण होईल. 

सध्या आपल्याकडे कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झालेले आहे, हे खरे आहे, तरीही आपण सोशल डिंस्टन्सिग पाळणे, योग्य मास्क योग्य रीतीने वापरणे, सॅंनिटायझर/साबणाचा वारंवार वापर करणे, अनावश्‍यक प्रवास टाळणे, गर्दी न करणे या गोष्टींचे पालन करीतच राहूया.

सध्या यावरच आपले लक्ष हवे.नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी संत्री, मोसंबी, लिंबू, आवळा, च्यवनप्राश असे क जीवनसत्व युक्त फळांचे सेवन नियमित करीत राहूया. प्रतिकार शक्ती म्हणजे पी हळद आणि हो गोरी असा काही प्रकार नसतो. आहार हलका, पुरेसा, नियमित घ्या. दररोज प्राणायाम, आसने, फिरण्यासारखा व्यायाम कायमच ठेवा. हाच त्यासाठी शाश्‍वत मार्ग आहे. यापासून सुटका नाही.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT