Special attention to those twenty-one foreigners in Atpadi 
पश्चिम महाराष्ट्र

त्या एकवीस परदेशींवीर विशेष लक्ष 

सकाळवृत्तसेवा

आटपाडी : विविध देशांत नोकरी आणि व्यवसायानिमित्त गेलेले तालुक्‍यातील एकवीसजण तालुक्‍यात परतले असून त्यांच्यावर आरोग्य विभागाने विशेष लक्ष दिले आहे. त्यांच्यावर सध्या घरीच तपासणी आणि उपचार सुरू केले असून त्यांना घराबाहेर न पडण्याचे सक्त आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी गुडेवार यांनी तालुक्‍यात परदेशातून आलेल्या तरुणांची भेट घेऊन काही सूचना केल्या. 

कोरोना रोगाचा जगभर प्रसार होऊ लागल्यामुळे तालुक्‍यातील बाहेरच्या देशात गेलेले गावाकडे परतू लागले आहेत. आत्तापर्यंत एकवीसजण परदेशातून आटपाडी तालुक्‍यात आले आहेत. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुडेवार यांनी शेटफळे आणि आटपाडी गावांना भेटी देऊन परदेशातून आलेल्या लोकांची भेट घेऊन काही सूचना केल्या.

या सर्वांची तालुका वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांनी भेटी घेऊन तपासणी केली. तसेच त्यांच्या हातावर शिक्के मारून घराबाहेर न पडण्याचे सक्त आदेश दिले आहेत. याशिवाय यांच्या संपर्कात आरोग्य विभागाचे आरोग्य सेवक नियमित आहे. या लोकांच्या शरीरात काही बदल किंवा इतर त्रास होतो का याचा दिवसातून तीन वेळा आढावा घेतला जातो. तसेच कोणताही त्रास वाटल्यास तातडीने उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालयात दाखल होण्याचे आवाहन केले आहे.

कोरोना साथीचा संपूर्ण तालुक्‍यावर परिणाम झाला असून जनजीवन विस्कळित झाले आहे. गावचे आठवडा बाजार रद्द केले आहेत. संपूर्ण आटपाडी शहरात दिवसभर पूर्ण शुकशुकाट असतो. कोणीही घराच्या बाहेर कामाशिवाय पडत नाही. येथील बसस्थानकावर संपूर्ण दिवसभर शुकशुकाट असतो. बसफेऱ्या ही कमी केल्या आहेत. तसेच सलून दुकाने, पान टपरी आणि इतर दुकाने मोठ्या प्रमाणात बंद केली आहेत. बाजार पटांगण, तहसील कार्यालय चौक येथेही शुकशुकाट आहे. प्रशासकीय कार्यालये ओस पडली आहेत. .  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Stock Limit: साखर व्यापाऱ्यांना मोठा झटका! ४ हजार क्विंटलपेक्षा जास्त साठ्यावर बंदी; १ ऑगस्टपासून नवे नियम

Koyna Water Release: कोयना धरणातून मोठा विसर्ग! ९१ टीएमसी पाणीसाठा, कृष्णा नदीची पातळी वाढली

Gen Z's New Craze: 'स्नेल मेल' ट्रेंड नक्की आहे तरी काय? जेन झीला अचानक का आवडायला लागलीत हाताने लिहिलेली पत्रे!

Latest Marathi News Live Update : पंतप्रधानांच्या आवाहनानुसार देशातील नवे कायदे राज्यातही अंमलात आणणार - मुख्यमंत्री विष्णू देव साय

Success Story: तळेगावच्या मुलीची देशभरात चर्चा! 'मिस गॉर्जियस फेस ऑफ इंडिया' किताबावर नाव; जिद्द, मेहनत अन् स्वप्नांची कमाल

SCROLL FOR NEXT