Speed ​​up cleanliness, preparation for Navratri; Beautiful view of the ghats in the morning and evening 
पश्चिम महाराष्ट्र

स्वच्छतेला वेग, नवरात्रीची तयारी; घाटांवर सकाळ संध्याकाळी मनोहारी दृश्‍य

वैभव यादव

अंकलखोप (जि. सांगली) : कोरोनामुळे सहा-सात महिने ग्रामीण 
भागात मरगळ आली होती. ती आता नवरात्रीच्या तयारीनिमित्त झटकली जात आहे. वातावरण बदलत आहे. घराघरांत कामाची धांदल उडाली आहे. झाडलोट, धुणी-भांडी करण्यासाठी नदीकाठी वर्दळ वाढली आहे. गोधड्या आणि अंथरून-पांघरून धुण्याचा कार्यक्रमच नदीकाठावर सुरू आहे. 

पलुस तालुक्‍यात कृष्णाकाठी गावागावांत, घाटावर धुणी धुण्यासाठी झुंबड उडाली आहे. घाटावर वाळत टाकलेल्या गोधड्यांचे मनोहार नजारा दिसत आहे. रंगीबेरंगी गोधढ्या, चादरी, ब्लॅंकेटनी मन मोहवणारे चित्र पाहायला मिळत आहे. 

अंकलखोप, भिलवडी, बुर्ली, आमणापूर, नागठाणे, धनगाव आदि ठिकाणी घाटावर असेच चित्र आहे. सणांनिमित्त वर्षातून दोन-तीनदा ग्रामस्थ अंथरून, पांघरून धुण्याचा कार्यक्रम राबवला जातो.

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर दिवसभर गोधडया धुण्यासाठी गर्दी वाढत आहे. विद्यार्थी, नोकरदार सुटीमुळे घरीच असल्याने महिला उत्साहात आहेत. अधूनमधून मगरी दर्शन देत आहेत. 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

World Cup 2025: 'आता विजयाची सवय लावायची...' वर्ल्ड कप विजयानंतर काय म्हणाली कॅप्टन हरमनप्रीत कौर?

SCROLL FOR NEXT