download.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

झरेत धक्का, पाच  वर्षाचा मुलगा कोरोना बाधित 

सकाळवृत्तसेवा

झरे (सांगली) झरे (ता. आटपाडी) येथील पाच वर्षाचा मुलगा पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे. दोनच दिवसापूर्वी येथील 58 वर्षाच्या महिलेला त्रास जाणवू लागल्याने तिला तपासणीसाठी नेले असता तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती. त्या पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कामध्ये तिचा मुलगा, सून, दोन नातवंडे, आली होती. त्या चौघांनाही तपासणीसाठी मिरजला नेले असता चौघापैकी तिघांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर पाच वर्षाचा लहान मुलगा त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

गाव भागांमध्ये झोन लागू केला आहे. तर सर्व दुकाने बंद ठेवली आहेत. नागरिकामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. ती महिला व तिची मुले मुंबई कुर्ला येथे राहत होती. ग्रामपंचायत मध्ये सरपंच सिंधू माने व उपसरपंच हनमंत मोटे, ग्रामसेवक दत्ता गळवे, यांनी तातडीची बैठक घेऊन उपाययोजना सुरू केल्या आहेत. गावातून जंतुनाशक फवारणी सुरू केली

 व प्रत्येक नागरिकास मास्कचे वाटप करणार असल्याचे सरपंच सिंधू माने यांनी सांगितले. आरोग्य विभागाच्या टीमने गावांमध्ये सर्व मेडिकल तपासणी केली . व जिथे जिथे गावांमध्ये घाणीचे साम्राज्य आहे तेथे स्वच्छ करण्याच्या सूचना ग्रामपंचायत ला देण्यात आल्या आहेत .

खरसुंडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी एम ,एम, जाधव व त्यांची टीम सकाळीच हजर झाली होती. तसेच तहसीलदार सचिन लंगोटे, गट विकास अधिकारी पंकज शेळके यांनी गावांमध्ये भेट देऊन ग्रामसमितीला सूचना दिल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मान्सून २४ तासात अंदमानात दाखल होणार, केरळ अन् महाराष्ट्रात कधी पोहोचणार? हवामान विभागाने दिले अपडेट

सरकारी बाबू अन् सेलिब्रिटींच्या काळी गुंतवणुकीचं बिंग फोडणाऱ्याला अटक; सहाय्यक आयुक्तांसह ५ जणांवर गुन्हे दाखल

Petrol Diesel Saving Tips : पेट्रोल-डिझेल वाजवण्याच्या 12 गोल्डन ट्रिक्स; आजच बदला 'या' सवयी, महिन्याभरात होईल हजारोंची बचत

बुकिंग केलेली गाडी आम्ही नागराज मंजुळेंमुळे कॅन्सल केली, अरबाज शेखने सांगितला किस्सा, म्हणाला, 'ऐनवेळेला निर्णय बदलला...'

Maharashtra Latest News Live : गर्भलिंग निदान प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत; आणखी दोन डॉक्टर अटकेत

SCROLL FOR NEXT