पश्चिम महाराष्ट्र

एसटी सवलत स्मार्टकार्डला मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - एसटी महामंडळातर्फे विविध प्रवासी सवलतीचा लाभ घेण्यासाठी स्मार्टकार्ड घेणे बंधनकारक केले आहे. अनेकांनी स्मार्टकार्ड अद्याप घेतलेले नाही. अशांना ३१ डिसेंबरपर्यंत स्मार्टकार्ड घेण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. 

यात शालेय, महाविद्यालयीन, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदींची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिलेले वरील आदेश एसटी महामंडळाच्या येथील विभाग नियंत्रण कार्यालयास आले आहेत.  शाळा, महाविद्यालय सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची एसटी केंद्रावर स्मार्टकार्ड घेण्यासाठी गर्दी होत आहे. इतक्‍या मोठ्या प्रमाणात स्मार्टकार्ड एकाच वेळी देता येणे शक्‍य नाही, अशी कार्ड देण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी जुन्या पद्धतीचा अवलंब सवलत देण्यात येत आहे.             

१ जानेवारी २०२० पासून स्मार्टकार्ड बंधनकारक असेल. त्यामुळे सर्व सवलतधारकांनी ३१ डिसेंबरपर्यंत स्मार्टकार्ड काढून घ्यावे, असे आवाहन रावते यांनी आदेशात म्हटले आहे. 

मशीनला व्हर्जन बसविण्याचे काम
वाहकांना खासगी कंपनीने तयार केलेली तिकीट मिशन दिली आहे, त्यातून तिकीट दिले जाते. सवलतधारकाचे स्मार्टकार्डही स्वॅप करण्यात येते, मात्र एका आगारातील शंभर वाहकांकडे शंभर तिकीट मशीन असतील तर त्यातील जवळपास  २५ ते ३० टक्के तिकीट मशीनवर स्मार्टकार्ड स्वॅप होत नाही. कारण या मशीनमध्ये स्मार्टकार्ड स्वॅप करण्याचे व्हर्जन नाही. यातून वाहक व प्रवासी यांच्यात वाद होऊ लागले आहेत. व्हर्जन बसविण्याचे काम सुरू आहे. काही महिन्यांत सर्वच मशीनवर स्मार्टकार्ड स्वॅप होतील, असेही वाहकांकडून सांगण्यात आले.

दृष्टिक्षेपात...

  •  जानेवारी २०२० पासून स्मार्टकार्ड बंधनकारक
  •  राज्यात ३५ लाख विद्यार्थी सवलतधारक
  •  ५० लाख ज्येष्ठ नागरिक लाभार्थी
  •  स्वातंत्र्य सैनिक, दिव्यांग, पत्रकार आदींना सवलत 
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT