st bus.png 
पश्चिम महाराष्ट्र

"एसटी' महामंडळाने बदल्यांची प्रक्रिया राबवावी : एसटी कामगार संघटना

सकाळवृत्तसेवा

सांगली-  राज्य परिवहन महामंडळाच्या बदली धोरणानुसार अधिकारी व कर्मचारी यांच्या विनंती बदल्या केल्यास महामंडळाला आर्थिक खर्च येणार नाही. त्यामुळे विनंती बदली, वैद्यकीय कारणास्तव बदली, आपापसातील बदली, पती-पत्नी एकत्रिकरण बदल्या कराव्यात अशी मागणी एसटी कामगार संघटनेने राज्य परिवहनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे केली आहे. 

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी वित्तीय वर्षात कोणत्याही संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांची बदली करण्यात येऊ नये अशा सूचना दिल्या आहेत. मात्र महामंडळाच्या 2014 मधील ठरावानुसार अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्यांबाबत धोरण निश्‍चित केले आहे. त्यानुसार परिपत्रक काढून सर्व विभागात सूचना दिल्या आहेत. या धोरणानुसार कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या, आपापसातील विनंती बदल्या वर्षातून दोनवेळा मे-जून आणि डिसेंबर महिन्यात करण्यात असे निश्‍चित केले आहे. 

सध्या काटकसरीचा उपाय म्हणून बदल्या न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वास्तविक प्रशासकीय बदली करताना आर्थिक खर्चाचा प्रश्‍न निर्माण होतो. विनंती किंवा आपापसातील विनंती बदली केल्यास महामंडळाला कोणतेही आर्थिक नुकसान नाही. त्यामुळे बदल्या न करण्यामागील आर्थिक कारण योग्य नाही. महामंडळाच्या बदली धोरणानुसार प्रक्रिया राबवल्यास कोणताही आर्थिक खर्च येणार नाही. त्यामुळे विनंती, वैद्यकीय, आपापसातील तसेच पती-पत्नी एकत्रिकरण बदल्या कराव्यात. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर होतील असेही जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे व अध्यक्ष संदीप शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

भारताला 'त्या' मोठ्या निर्णायानं बनवलं T20 World Cup चॅम्पियन, रिकी पाँटिंग स्पष्ट बोलला; सूर्याचंही केलंय कौतुक

Latest Marathi Live Update : संध्याकाळी बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात विश्वविजेत्या भारतीय संघाचा होणार गौरव

अंबरनाथ पालिकेत महायुतीत खडाजंगी, शिवसेनेचा भाजपच्या विकासकामांना ब्रेक; पडद्यामागे काय घडतयं?

Manmad Indore Railway Project : जोपर्यंत मोबदला जाहीर होत नाही, तोपर्यंत मोजणी नाही! मनमाड-इंदूर रेल्वे बाधित शेतकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT