ST bus
ST bus 
पश्चिम महाराष्ट्र

ड्युटी अर्धवट सोडून गेलेल्या 40 चालक-वाहकांचे निलंबन 

सकाळवृत्तसेवा

सांगली : राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी गुरुवारी मध्यरात्रीपासून अचानक संपावर गेले. लालपरी थांबली. प्रवाशांची गैरसोय झाली. अर्धवट ड्युटी सोडून गेलेल्या सांगली विभागातील 40 चालक-वाहकांना निलंबित करण्याचे आदेश एस. टी. महामंडळाने विभाग नियंत्रकांना सायंकाळी दिले. सांगली- आटपाडी एस.टी. बसवर कवलापूर-कुमठे फाटी दरम्यान दगडफेकीचाही प्रकार घडले. आरटीओ विभागाने खासगी प्रवाशी वाहतुकीतून प्रवाशी वाहतुकीस मुभा दिली. बसस्थानक परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. 

सहाय्यक विभाग नियंत्रक अरुण वाघाटे म्हणाले,""सांगली विभागातील चालक-वाहक गुरुवारी रात्रीच्या मुक्काम एस.टी. बस घेऊन गेले. त्यांनी आज बस डेपोत आणली. मात्र आजच्या फेऱ्या केल्या नाहीत. अशा 40 वाहक-चालकांना निलंबित करण्याचे आदेश एस. टी. महामंडळाने उशिरा दिलेत. त्यांची नावे उद्या (ता. 9) सकाळी नोटीस फलकावर लावण्यात येतील. ज्यांची शुक्रवारी साप्ताहिक सुटी आहे, ज्यांच्या रजा आहेत. असे सोडून अन्य कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. मात्र अद्याप लेखी आदेश नाहीत.'' 

"परिवहन मंत्र्यांनी जाहिर केलेली पगारवाढ फसवी आहे. सर्व कर्मचारी लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहेत. आता तरी सरकारने मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलावीत.'' 
- विलास यादव,  एस. टी. कामगार नेते. 

जिल्ह्यावर एक दृष्टीक्षेप... 
0 प्रतिदिन एस. टी. फेऱ्या ः सुमारे 1550 
0 चालक-वाहकांची संख्या ः 4560 
0 शुक्रवारी दिवसभर झालेल्या फेऱ्या ः केवळ 86 
0 कामावर हजर ः केवळ 13 टक्के चालक-वाहक 
0 संपाची जबाबदारी ः इंटक कर्मचारी संघटनेने घेतली 
0 उत्पन्न बुडाले ः प्रतिदिनी 59 लाख (सांगली विभाग) 
0 नियमित सेवा ः शिवशाही बस 
0 प्रवाशी वाहतुकीस खासगी बस, वाहनांना बसस्थानकांतून मुभा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT