corona logo.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

जिल्ह्यात शुक्रवारपासून एसटी, बाजारपेठा, पानपट्टया सुरू 

सकाळवृत्तसेवा

सांगली- गेल्या 60 दिवसांपासून ठप्प असलेल्या सांगली जिल्ह्यातील सर्व व्यवहार शुक्रवारपासून (ता. 22) सुरू होणार आहेत. सर्व बाजारपेठा, दुकाने (मॉल्स्‌ बंदच), पानपट्टया सुरू होणार आहेत. जिल्ह्यांतर्गत बससेवाही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे, पण सोशल डिस्टन्सिंगसह अटी नियमांचे पालन केलेच पाहिजे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. नियमभंग आणि गर्दी केल्यास संबंधित दुकान बंदची कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. 

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले,""कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक राज्य सरकारने जाहीर केल्या आहेत. यामध्ये रेड झोन आणि नॉन रेड झोन असे दोनच भाग केले आहेत. सांगली जिल्ह्यात कोरोना बांधितांनी अर्धशतक पूर्ण केले आहे. सद्य:स्थितीत 23 रुग्णांवर मिरजेतील कोरोना रुग्णालयात उपचार सुरू असून 33 जण बरे झाले आहेत. सांगली जिल्ह्याचा नव्या निकषानुसार नॉन रेड झोनमध्ये समावेश केला आहे. या झोनमध्ये कंटेनमेंट झोन वगळता अन्य सर्वत्र बाजारपेठा, दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक्त कुठल्याही जिल्हा अथवा महापालिका प्रशासनाला मुख्य सचिवांच्या मान्यतेशिवाय स्वतंत्र आदेश काढता येणार नाहीत.'' 

सांगलीत एसटी सुरू होतेय 

एसटी थांबली की सारं जग थांबल्यासारखं वाटलं. लाल परी रस्त्यावर धावायला लागली की आपलं जग धावायला लागतं. ही लाल परी गेल्या 60 दिवसांपासून बंद आहे. एसटीचा स्टार्टर आता लागणार आहे. चाकं पुन्हा शुक्रवारपासून धावणार आहेत. एसटीमध्ये प्रवेश करताना हातावर सॅनिटायझर घ्यावे लागणार आहे. 

हे राहणार बंदच... 

  •  शाळा, महाविद्यालये, शिक्षण संस्था, प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, क्‍लासेस, ई- लर्निंग. 
  •  हॉटेल बंद, पार्सल सेवा सुरू 
  •  बसस्थानकावरील हॉटेल सुरुला परवानगी 
  •  चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, क्रीडा संकुल, जतरणतलाव, करमणूक संकुले, नाट्यगृहे, बार आणि ऑडिटोरियम, हॉल 
  •  सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक सण आणि कार्यक्रम 
  •  धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, एकत्र येण्यावर बंदी

रात्रीची संचारबंदी 

  • अत्यावश्‍यक सेवा वगळता रात्री 7 ते सकाळी 7 वाजता या दरम्यान संचारबंदी असेल. स्थानिक प्रशासन यासंदर्भात कलम 144 लागू राहील. 
  • ज्येष्ठ नागरिक, बालकांची सुरक्षा 
  •  ज्येष्ठ नागरिक (65 वर्षांवरील), गरोदर महिला, 10 वर्षांखालील मुलांनी अत्यावश्‍यक सेवा वगळता घरातच थांबावे 

 कंटेनमेंट झोन्स 
महापालिका किंवा जिल्हा प्रशासन त्यांच्या भागातील रेड झोन, नॉन रेड झोन तसेच कंटेनमेंट झोन निश्‍चित करतील. महापालिका क्षेत्रात आयुक्त आणि जिल्ह्याच्या उर्वरित भागात जिल्हाधिकारी यांना कंटेनमेंट झोन निश्‍चित करणार 

गावबंदी, रस्तेबंदी नाही-
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले,""कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात कोणासही स्वतंत्र गावबंदी किंवा रस्ते बंदी करता येणार नाही. अन्यथा संबंधित जबाबदार व्यक्तिवर गुन्हे दाखल केले जातील. प्रतिष्ठेसाठी अमूक दिवस लॉकडाऊनचे अधिकार कोणासही असणार नाहीत. गावातील सार्वजनिक रस्त्यावर अडथळे निर्माण केले असतील तर ते दूर केले जातील. यापुढे तसे झाल्यास कारवाई करू.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

४ वर्षात १११ खासदार-आमदारांचे पक्षांतर, सर्वाधिक इनकमिंग झालेला पक्ष भाजप नव्हे, भाजपात २९ जणांचा प्रवेश

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

Vastu Tips: पिंपळ, तुळस की मुख्य दार? पितृपक्षात संध्याकाळी का अन् कुठे लावावा दिवा? वास्तुनुसार जाणून घ्या योग्य दिशा अन् फायदे!

Pune Drought: पावसाअभावी भातपिके वाळू लागली; मुळशी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक

Traditional Farming: ट्रॅक्टरच्या युगातही बैलजोडीचा ध्यास; २२ वर्षांच्या ‘राजा’नंतर खंडेराव बकाल यांनी पुन्हा जपला शेतीचा पारंपरिक वारसा

SCROLL FOR NEXT