st bus.png 
पश्चिम महाराष्ट्र

"लालपरी' शुक्रवारपासून जिल्ह्यात धावणार : निम्मेच प्रवासी भरणार

सकाळवृत्तसेवा

सांगली- "कोरोना' च्या संकटामुळे गेले दोन महिने बंद असलेली "एसटी' बसेस सेवा शुक्रवार (ता.22) पासून सुरू होणार आहे. "लालपरी' ला दोन महिन्यात जिल्ह्यात कोट्यवधी रूपयाचा तोटा झाला असून पुन्हा एकदा निम्मेच प्रवासी भरून ती तोट्यातच धावणार आहे. 


"कोरोना' चा प्रादुर्भाव झाल्यानंतर 14 मार्चपासून राज्यातील शाळा व महाविद्यालये बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे एसटी बसेसच्या फेऱ्या सुरवातीला कमी करण्यात आल्या. त्यानंतर 23 मार्च रोजी "लॉकडाउन' जाहीर केल्यानंतर तेव्हापासून एसटीचे चाक जागेवरच थांबवण्यात आले. जिल्ह्यातील दहा आगारातील 800 हून अधिक गाड्यांच्या सर्वच फेऱ्या थांबल्या. दररोज लाखो रूपयांचे नुकसान होऊन आतापर्यंत कोट्यवधी रूपयांचा फटका बसला आहे. आठवड्यापूर्वी परप्रांतीय मजूरांना सोडण्यासाठी एसटी धावू लागली आहे. 


लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात शिथिलता आल्यानंतर शुक्रवार (ता.22) पासून प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी आणि जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार शुक्रवारपासून एसटी च्या फेऱ्या सुरू होत आहेत. मात्र ज्या मार्गावर प्रवाशांची गर्दी असेल त्या मार्गावरच एसटी धावणार आहे. तसेच 50 टक्के आसन क्षमतेने प्रवासी भरले जातील. त्यानुसार प्रत्येक बसमध्ये 22 प्रवासीच असतील. मास्क असल्याशिवाय प्रवाशांना आतमध्ये प्रवेश मिळणार नाही. तसेच प्रवाशांना नियमित दराने तिकिट आकारले जाणार आहे. 

544 फेऱ्या सुरू राहणार- 
सांगली ग्रामीण-12 फेऱ्या, सांगली शहर-130, मिरज ग्रामीण-34, मिरज शहर-58, इस्लामपूर- 42, तासगाव-42, विटा- 36, जत- 30, आटपाडी- 22, कवठेमहांकाळ- 58, शिराळा- 56, पलूस- 24 याप्रमाणे दहा आगारातून 544 फेऱ्या सध्या सुरू होतील. त्यासाठी 92 चालक व 92 वाहक कार्यरत असतील. दररोज 14 हजार 488 किलोमीटर अंतरासाठी फेऱ्या निश्‍चित केल्या आहेत. 

तोट्यात धावणार- 
दोन महिने चाक थांबल्यामुळे एसटी चे सांगली विभागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. भारमान वाढवा अभियानाला कोरोनाचा फटका बसला आहे. आता 50 टक्के प्रवासी क्षमतेने एसटी आणखी तोट्यात धावणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: सिक्स मारल्यानंतरही शिवम दुबेला कसं केलं आऊट? रवींद्र जडेजा म्हणाला, 'त्याला नेट्समध्ये गोलंदाजी केलीये, माहित होतं तो...'

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

SCROLL FOR NEXT