The state government stands firmly behind the farmers 
पश्चिम महाराष्ट्र

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे

बादल सर्जे

जत : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यात येत असून प्रशासकीय यंत्रणेतर्फे पंचनामे करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून निघणारे नाही. मात्र, त्यांना आवश्‍यक मदत शासन करेल. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिल, असे आश्वासन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. 

जत तालुक्‍यातील येळवी, अचकनहळ्ळी, निगडी, रावळगुंडवाडी या गावात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीची पाहणी पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली. तेथील शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यानंतर जतमध्ये शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत, बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौगुले, ज्येष्ठ नेते बसवराज पाटील, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, बाबासाहेब कोडग, माजी सभापती सुरेश शिंदे, रमेश पाटील, चन्नाप्पा होर्तीकर, सिध्दुआण्णा शिरसाड, प्रकाश जमदाडे, मन्सूर खतीब, बसवराज धोडमणी, शिवाजी शिंदे, उत्तमशेठ चव्हाण, आदीसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. 

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, गेल्या चार दिवसात पावसाने अतिवृष्टी झाली. सर्वच पिकांना याचा फटका बसला असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यासर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. लवकरच नुकसानीचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर मदतीसाठी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सांगली 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

SCROLL FOR NEXT