state level kho kho competition in ratnagiri first rank win by girls in sangli 
पश्चिम महाराष्ट्र

शाब्बास! सांगलीत सावित्रीच्या लेकींचा राज्यात झेंडा

विजय लोहार

नेर्ले (सांगली) : येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयातील मुलींचा राज्यस्तरावरील खो - खो स्पर्धेत १८ वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक मिळवला. रत्नागिरी येथे या स्पर्धा पार पडल्या. डेरवन युथ गेम्स या नावाने या स्पर्धा होतात. नेर्ले येथील सावित्रीच्या लेकींनी राज्यस्तरीय मारलेली मजल प्रेरणादायी आहे. नेर्ले येथील रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींनी रत्नागिरी येथे झालेल्या राज्यस्तरीय खो खो - खो स्पर्धेत सहभाग घेतला होता. १८ वर्षाखालील मुलींच्या संघाने अत्यंत चुरशीच्या सामन्यात वाडीकुरोली (पंढरपूर) या संघास ६ गुणांनी पराभूत केले. पुन्हा एकदा खो - खो साठी वर्चस्व प्रस्थापित करत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.

स्पर्धेतील उत्कृष्ट संरक्षक

नेहा वाठारकर, उत्कृष्ट खेळाडू म्हणून स्नेहल चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले. तसेच १४ वर्षाखालील संघाने तृतीय क्रमांक पटकावला. कर्णधार म्हणून साक्षी पाटील, प्रशिक्षक एस. डी. पोपेरे. राज्य स्तरावर उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल, वॉरियर्स स्पोर्ट्सच्या वतीने आणि पालकांच्यावतीने खेळाडूंचे स्वागत करण्यात आले. यावेळी वॉरियर्स स्पोर्ट्सचे अध्यक्ष हेमंत पाटील, उपाध्यक्ष- मानिकराव माने, सदस्य, हणमंतराव निकम, धनाजी पाटील, सुरेश पाटील, सुधीर पाटील, बी. ए कदम, सुभाष पाटील, विकास गवारकर, सतीश चव्हाण, मख्याध्यापिका सौ. देवकारे, डी.एम.माळी  पालक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुरुंगात असलेल्या आदेंकरांच्या घरातील दोघींना राष्ट्रवादीची उमेदवारी, अजितदादांनी दिले एबी फॉर्म

Sangli Election : काँग्रेससोबत बोलणी सुरूच; अन्यथा वंचित २१ जागांवर ‘गॅस सिलिंडर’वर रणांगणात

Latest Marathi News Live Update : वर्सोवा प्रभाग क्रमांक ५९ मध्ये ठाकरे गटात बंडखोरी उघड

Boxer Car Accident: दिग्गज बॉक्सरचा गंभीर अपघात, वेगात कार ट्रकवर आदळली; दोघांचा जागीच मृत्यू; Video

'मासिक पाळीच्या काळातही करायचा लैंगिक अत्याचार, घरात नग्न फिरायचा अन् महिलांकडं अश्लील...'; HR मॅनेजरची पतीविरोधात तक्रार

SCROLL FOR NEXT