congress signature nivedan.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

कृषी कायद्याविरोधात शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे लाख सह्यांचे निवेदन 

घनश्‍याम नवाथे

सांगली-  केंद्र सरकारने अंमलात आणलेले शेतकऱ्यांच्या विरोधातले कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी सांगली शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने एक लाख सह्यांचे निवेदन कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना दिले. कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यावेळी उपस्थित होते. 

केंद्र सरकारने नुकतेच तीन कृषी कायदे अंमलात आणले आहेत. या कृषी कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे. दोन महिन्यापासून कायद्याच्या विरोधात आंदोलने केली जात आहेत. रास्ता रोको, मेळावा, सत्याग्रह आंदोलन, व्हर्च्युअल रली व ट्रॅक्‍टर रॅली आदी माध्यमातून जिल्ह्यात शेतकरी विरोधी कायद्यांना जोरदार विरोध करण्यात येत आहे. दोन महिन्यात विविध आंदोलनाबरोबरच कायद्याला विरोध करण्यासाठी नुकतेच सह्यांची मोहिम सुरू करण्यात आली.

महापालिका क्षेत्र आणि परिसरातून कायद्याला विरोध करण्यांच्या स्वाक्षरी घेतल्या जात आहेत. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून राष्ट्रपतींना सह्यांचे निवेदन सादर केले जाणार आहे. सांगली शहर जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने शेतकऱ्यांच्या एक लाख सह्या असलेले निवेदन शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी बनवले आहे. आज हे निवेदन प्रदेशाध्यक्ष श्री. थोरात यांच्याकडे सादर करण्यात आले. त्यांच्यामार्फत ते राष्ट्रपतींना पाठवण्यात येणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT