0crime_201_74.jpg
0crime_201_74.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

चक्क...स्मशानातून वाळू चोरीचा प्रताप

सकाळवृत्तसेवा


आटपाडी : मोकाट सुटलेले वाळूतस्कर वाळूसाठी आता स्मशानभुमीत पोहोचले आहेत. येथील डवरी समाजाच्या स्मशानभूमीत दफन केलेले दोन मृतदेह उकरून काढून 10 ब्रास वाळू तस्करांनी चोरून नेली आहे. 


आटपाडी तालुक्‍यात वाळूतस्करांनी अक्षरश थैमान घातले आहे. महसूल विभागाच्या कारवाईनंतर तेवढे चार दिवस थंड होतात. पुन्हा नव्या दमाने तस्कर वाळू चोरीला लागतात. बोंबेवाडी, कौठुळी, खानजोडवाडी, दिघंची, शेटफळे, करगणी याभागात राजरोसपणे वाळूचोरी चालू असते.

आटपाडी शहरात तर रात्रभर वाळूची वाहने सुसाट धावत असतात. वाळू तस्कर मिळेल तिथून वाळू चोरी करू लागलेत. वाळू तस्कर अक्षरशा मोकाट सुटले आहेत. त्यांच्यावर महसूल आणि पोलिसांचे नियंत्रण राहिले नाही. त्यामुळेच तस्कर आता स्मशानभुमी पर्यंत पोहोचले आहेत.

बहुतांश स्मशानभुमी ओढया काट्याला असतात.तेथे वाळू असते. आटपाडी येथील डवरी समाजाची स्मशानभूमी येथील शुकओढा पात्रात आहे.तेथे मृतांचे दफन विधी केले जातात. दोन दिवसापूर्वी वाळूतस्करांनीया स्मशानभुमीकडे आपला मोर्चा वळवला. तेथे 10 ब्रास वाळू चोरून नेली.

.वाळू भरताना दफनविधी करून केलेले दोन मृतदेह बाहेर कडून वाळू भरून नेली आहे.या मृतदेहांचे कपडे, सडलेले अवयव उघड्यावर विखुरले गेले असून मृतदेहाची विटंबना केली आहे.त्यामुळे संतप्त झालेल्या डवरी समाजातील लोकांनी प्रशासनाकडे तक्रार केली. त्या तक्रारीच्या आधारे तलाठी सुधाकर केंगार यांनी स्मशानभुमीतून 10 ब्रास वाळू चोरीला गेल्याची तक्रार आटपाडी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT