पश्चिम महाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात पाऊस सुरुच ; कोयनेचे दहा फूट दरवाजे उचलले

सकाळ वृत्तसेवा

सातारा : जिल्ह्यात आज (गुरुवार) पहाटे आणि काल (बुधवार) दिवसभरात एकूण 332.91 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 23.60 मिलीमीटर पाऊस झाला आहे. पश्‍चिमेकडील भागात आज (गुरुवार) सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच राहिली. कोयना धरणात 104.18 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. दरम्यान सकाळी साडे अकरा वाजता काेयनेचे दहा फुट दरवाजे उचलले असून 86 हजार 506 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे.  
महापूर, अतिवृष्टीचा धक्‍क्‍यातून पश्‍चिमेकडील लोक सावरताहेत तोवर पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील भागासह सातारा परिसरात आजही (गुरुवार) पावसाच्या सरी सुरू राहिल्या आहेत. पावसाचे प्रमाण वाढल्याने ऐन गणेशोत्सवात जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहेत. शिवाय, बाजारपेठांमध्ये ग्राहक, विक्रेत्यांची धांदल उडत आहे. जिल्ह्यात सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिलीमीटर मध्ये अशी ः सातारा 22.88 (1684.31) , जावळी- 51.02 (2168.05), पाटण- 40.00 (1929.48) , कराड 12.62 (970.38) , कोरेगाव- 9.22 (662.00) , खटाव- 3.33 (421.22) , माण- 0(161.41) , फलटण- 2.78 (190.56) , खंडाळा- 3.25 (506.90) , वाई- 20.34 (863.66) , महाबळेश्वर- 167.48 (6851.64) याप्रमाणे आजपर्यंत एकूण 16409.60 मिली मीटर तसेच सरासरी 1265.20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 
कोयना धरणक्षेत्रात कोयना 145 मिली मीटर, नवजा 316 मिली मीटर, महाबळेश्वर 157 मिली मीटर. एवढया पावसाची नोंद झाली असून कोयना धरणात 104.18 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. 

प्रमुख धरणातील पाणीसाठा 
धोम एकूण क्षमता- 13.50, उपयुक्त पाणीसाठा- 11.26 टीएमसी, टक्के- 96.31, धोम बलकवडी एकूण क्षमता-4.08 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा- 3.94 टीएमसी टक्के- 99.57, कण्हेर एकूण क्षमता-10.10 टीएमसी, उपयुक्त पाणीसाठा- 9.48 टीएमसी, टक्के- 98.82, उरमोडी एकूण क्षमता-9.96 टीएमसी, उपयुक्त पाणीसाठा- 9.56 टीएमसी, टक्के- 98.99, तारळी एकूण क्षमता टीएमसी -5.85 पाणी साठा- 5.37 टीएमसी टक्के- 91.97, निरा देवघर एकूण क्षमता-11.91 टीएमसी पाणीसाठा- 11.73 टीएमसी, टक्के-100, भाटघर एकूण क्षमता 23.75 टीएमसी पाणीसाठा- 23.42 टीएमसी, टक्के-99.6, वीर एकूण क्षमता-9.83 टीएमसी,पाणीसाठा- 9.41 टीएमसी, टक्के-100 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT