Stock market fraud
Stock market fraud  sakal
पश्चिम महाराष्ट्र

शेअर बाजार ठरतोय मायाजाल; तीन कोटींची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

सांगली : शेअर बाजारातून भरमसाठ नफा मिळवण्याच्या प्रयत्नात जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात सुमारे तीन कोटींची फसवणूक झाली आहे. मिरज, आटपाडी आणि आता दोन दिवसांपूर्वी विश्रामबागमधील गुंतवणूकदारांची तब्बल ७५ लाख रुपयांची फसगत झाली आहे. गुंतवणूकदारांची सहज कमाईची वृत्ती आणि अज्ञान हेच मुख्य कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Share Market Frauds)

बार्शी (जि. सोलापूर) येथील विशाल फटे यांचे प्रकरण अजूनही ताजेच आहे. तेवढ्यात विश्रामबाग येथे एका कुटुंबीयांची तब्बल ७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मौलासाब कोलार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. काही वर्षांपूर्वी ठराविक नागरिकांपुरता मर्यादित असलेला शेअरबाजार डिजिटल क्रांतिमुळे तळहातावरच्या मोबाईलमध्ये आला आहे. ग्रामीण भागातही रोजच कोट्यवधींचे ट्रेडिंग होत आहे. बाजारातील निर्देशांकावरील चर्चा आता खेड्यातही होत आहे.

बँका, पतसंस्था आणि पोस्टातील विविध योजनांमधील गुंतवणुकीचे व्याजदर कमी होऊ लागल्यामुळे दुसरा पर्याय म्हणून शेअरबाजाराकडे अनेकजण वळत आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास कमी काळात दामदुप्पट रक्कम तसेच जादा व्याज दराने पैसे मिळतील, असे आमिष गुंतवणूकदारांना दाखवले जातेय. काहींनी अभ्यास करून प्रशिक्षण देणारे वर्गही काढले आहेत, तर काहीजण ‘ब्रोकर’ बनले आहेत. तसेच काहींनी सल्ला देणाऱ्या पन्या स्थापन केल्या आहेत. सर्वत्र शेअरबाजाराचा भुलभुलय्या निर्माण झाला असून, त्यातून भामट्यांना वाव मिळाला आहे.

सध्या बार्शी येथील विशाल फटे याचे प्रकरण गाजत आहे. त्याने जादा परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींहून अधिक रुपयांना गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. आटपाडी येथे तीन महिन्यांपूर्वी एकाने एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले; तर मिरजेतही दामदुपटीच्या आमिषाने फसवणूक केल्याबद्दल गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी विश्रामबागला मौलासाब कोलार याने ७५ लाखांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला. काही महिन्यांपूर्वी शेअर बाजारात पैसे अडकल्यामुळे निवृत्त पोलिसाने कुटुंबासह आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता. ही उदाहरणे पाहिली तर शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत जपूनच पाऊल टाकावे लागेल.

काय दक्षता घ्याल!

  • शेअर बाजाराची संकल्पना समजून घ्या

  • संपूर्ण माहिती घेऊनच गुंतवणूक करा

  • गुंतवणुकीची सुरुवात कमी पैशांतून करा

  • स्वानुभवातून पुढे जात रहा

  • जादा परताव्याची अपेक्षा ठेवू नका

  • फक्त शेअरऐवजी गुंतवणुकीत वैविध्य ठेवा

शेअर, कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणुकीवर हमी देऊन ठराविक परतावा देणे हेच मुळी सेबीच्या (SEBI) कायद्यानुसार बेकायदेशीर आहे. यात कधी कधी अवास्तव नफा मिळू शकतो हे खरे आहे. मात्र प्रत्येकवेळी तो मिळेल असे वाटणेही चुकीचे आहे. मार्केटचा, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक घडामोडींचा, सर्वांगीण अभ्यास हवा. त्यासाठी सेबी मान्यताप्राप्त योग्य सल्लागारकडे जा. स्वतःही सतत अभ्यास करा. मध्यस्थांच्या भरवशावर गुंतवणूक केल्याने फसवणूक होते.

- उमेशकुमार माळी, सनदी लेखापाल

परकीय चलनातील देवाणघेवाण, क्रिप्टो करन्सीच्या ट्रेडिंगमधूनही फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. ठराविक रक्कम हमखास महिन्याला खात्यावर जमा करतो, असे एखादा ब्रोकर सांगत असेल; तर नक्की घोटाळा आहे असे समजावे. तसेच कधीच घडत नाही. सहज पैसा मिळवण्याचा हा मार्ग नाही. अशा आर्थिक गुन्ह्यात शिक्षा होण्याचे प्रमाण नगण्य आहे. त्यातून गुंतवणूकदारांनी चूक कोणाची असते हे लक्षात घ्यावे.

- मंदार बन्ने, गुंतवणूक सल्लागार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्यरात्री ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात! 4 जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी, धक्कादायक व्हिडिओ समोर

मतदारांच्या फायद्याची बातमी! पत्ता बदलण्यासाठी ‘अर्ज क्र.8’ तर यादीत नाव समाविष्टसाठी भरावा लागतो अर्ज क्र. 6; ‘या’ संकेतस्थळावर आजच भरा अर्ज

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केरळमध्ये 31 मे रोजी मॉन्सून होणार दाखल

National Dengue Day 2024 : डेंग्यूचे डास जवळपास फिरकणार ही नाहीत, फक्त तुमच्या दिनचर्येत करा 'हे' बदल

मोठी बातमी! विद्यापीठाच्या परीक्षांचा बदलणार पॅटर्न; आता विद्यापीठ घेणार 60 गुणांची परीक्षा तर महाविद्यालयाच्या हाती 40 गुण

SCROLL FOR NEXT