wadal.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

वादळ घरात घुसलं, पाळण्यातील बाळ डोळ्यादेखत उडून गेलं 

सकाळवृत्तसेवा

तासगाव (सांगली)- मतकुणकी गावातील नाईक वस्तीवर काळजाचा चटका लावणारी घटना काल घडली. या वस्तीवर काल वादळं आलं. ते इतकं जोरात होतं की घरात घुसलं आणि घराचं छतं उडून गेलं. त्यासोबत एक जीवही उडाला. तो जीव होता चार महिन्याचा गोंडस मुलीचा. ती त्या घरातील आड्याला बांधलेल्या पाळण्यात झोपली होती. वादळ घरात घुसतयं हे ध्यानात आल्यावर आई तिला पाळण्यातून काढायला पुढे सरसावलीच होती, पण तिच्या डोळ्यादेखत वादळानं सारं छत उचललं आणि पाळण्यासह बाळही उडून गेलं. काही मीटर अंतरावर जावून ते छत खाली कोसळलं आणि डोळ्यादेखत त्या निष्पाप लेकीचा बळी गेला. 


तासगाव तालुक्‍यातील मतकुणकी येथे सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्याने एका घराचे पत्रे उडून गेले. पत्र्याच्या आढ्याला बांधलेल्या पाळण्यातील सहा महिन्याचे चिमुकली देखील उडून जाऊन पडल्यामुळे त्याचा दुर्दैवी अंत झाला. अंगावर शहारे आणणाऱ्या आणि काळजात धस्स होणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 


विश्‍वास शिरतोडे नामक अल्पभूधारक शेतकरी वजा शेतमजुराच्या घरावर हे संकट कोसळलं. आधीच्या दोन लेकी आणि त्यावर आता तिसरी मुलगी झालेली. कष्टानं या साऱ्या लेकींना मोठं करायचं, डगायचं नाही, हे ठरवून कुटुंब काम करत होतं. त्या लेकीची आई गरज पडली तर दुसऱ्याच्या शिवारात कामाला जात होती. चार महिन्याच्या लेकीला काल तिनं आढ्याला बांधलेल्या पाळण्यात ठेवलं आणि पाऊस यायच्या आत सारा पसारा आवरावा म्हणून ती कामाला लागली होती. पण, तिच्या लेकीच्या भाळी काही वेगळंच लिहून ठेवलं होतं. वादळानं तिचा वेध घेतला. वादळं इतकं जोरात होतं की साऱ्या कुटुंबाचा त्यानं विध्वंस करून टाकला. शिरतोडे कुटुंबाची लेक या वादळानं गिळली. अवघ्या चार महिन्याच्या पोरीचा पत्रे आणि अँगलच्या ओझ्याखाली दबून मृत्यू झाला. 


जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आठवड्यापासून हजेरी लावत आहे. वादळी वाऱ्याने मुळे अनेक ठिकाणी घराचे पत्रे, छत उडून जात आहे. झाडे उन्मळून पडल्याच्या घटना आठवडाभरात घडल्या आहेत. तसेच मोठे डिजीटल फलक देखील उडून जात आहेत. तासगाव तालुक्‍यातही सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वाऱ्यासह मोठ्या गारा पडू लागल्या. त्यामुळे गावात सर्वांची पळापळ झाली. वादळी वाऱ्यामुळे मतकुणकी गावातील शेतकरी विश्‍वनाथ शिरतोडे यांच्या घराचे पत्रे हलू लागले. पत्राच्या आढ्याला चिमुकल्या सहा महिन्याच्या बाळाचा पाळणा टांगण्यात आला होता. अचानक जोरदार वाऱ्यामुळे भिंतीतून पत्रे उचकटले गेले. वाऱ्याबरोबर पत्रे आणि आढाला टांगलेला पाळणा देखील उडाला. अवघ्या काही सेकंदात हा प्रकार घडला. 
आमदार सुमन पाटील, तहसिलदार कल्पना ढवळे, सभापती डॉ. शुभांगी पाटील, सरपंच नेताजी पाटील यांनी या कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केले. त्या माऊलीचा हंबरडा काही थांबला नव्हता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

SCROLL FOR NEXT