This strange world record was achieved by a 13 year old boy 
पश्चिम महाराष्ट्र

शाब्बास !! १३ वर्षांच्या मुलाने केले ही अजब विश्वविक्रमी कामगिरी

सकाळवृत्तसेवा

मिरज (जि. सांगली ) : येथील 13 वर्षीय स्केटिंगपटू आमोद प्रसाद शानभाग याने डोळ्यावर पट्टी बांधून 40 मिनिटात पाच किलोमीटर अंतर स्केटिंग केले. त्याचा हा विश्वविक्रम असल्याचा दावा संयोजकांनी केला आहे. विश्व विक्रमाची नोंद लवकरच होईल. आमोदचा यथोचित सन्मान होईल, असे ओंकार शुक्‍ल यांनी सांगितले. 


कोरोना फायटर्सना मानवंदना देण्यासाठी रायझिंग स्पोर्टस क्‍लबने उपक्रमाचे आयोजन केले होते. आमोद क्‍लबचा खेळाडू आहे. अनेक राष्ट्रीय स्पर्धांत त्याने पारितोषिके मिळवली आहेत.

ऑक्‍सिजन पार्कमध्ये उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. किशोर पटवर्धन, सौ. इरावती पटवर्धन यांच्या हस्ते प्रारंभ झाला. कोठेही न अडखळता 40 मिनिटात आमोदने पाच किलोमीटरचा पल्ला गाठला. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. 

प्रशिक्षक मनोज यादव, उत्तम पाडियार, मोहन वाटवे, श्रेयस गाडगीळ, प्रसाद शानभाग, नेत्रतज्ञ डॉ. अनिल कुलकर्णी, डॉ. संदीप देवल, विलास गोखले, राजीव नरवाडकर, सौ. स्नेहा शानभाग, सौ. मुग्धा गाडगीळ उपस्थित होते.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'उंडवडी सुपे येथील अपघातात दाेनजण जागीच ठार'; कार व दुचाकीचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT