jayant patil.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉनडाऊनची गरज : पालकमंत्री जयंत पाटील

बलराज पवार

सांगली-  जिल्ह्यात जुलै महिन्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा काही फायदा झाला नाही. कोरोनाचा वाढता उद्रेक रोखण्यासाठी त्याची साखळी तोडणे गरजेचे आहे. त्यासाठी पुन्हा कडक लॉकडाऊन करण्याची आवश्‍यकता आहे, असे आपले मत आहे. यावर सर्वांशी बोलून निर्णय घेऊ अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली. 

पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगलीतील पत्रकारांशी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत ऑनलाईन संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संजय साळुंखे उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी यावेळी कोरोना रोखण्याबाबत करण्यात येत असलेल्या उपाय योजनांची तसेच नियोजनाची माहिती दिली. 
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, मध्यंतरी केलेल्या लॉकडाऊनचा काही उपयोग झाला नाही. बाजारात फिरताना नागरिकांना कोरोनाची भिती वाटत नाही असे दिसते. कोरोना वाढत चालला आहे. रुग्णांना बेड मिळत नाहीत, ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटरचा तुटवडा आहे, असे चित्र दिसते. प्रशासन तयारी करत आहे. 

ते म्हणाले, "कम्युनिटी स्प्रेडिंग सुरु आहे. प्रशासनाने खासगी रुग्णालये अधिग्रहीत केली आहेत. पण, तेथील कारभाराबाबत तक्रारी येत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घ्यावी आणि कारवाई करावी. तसेच बेड उपलब्धता सर्वांना कळेल यासाठी जिल्ह्याची सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टीम करावी. रुग्णांनी बेड शोधत फिरण्यापेक्षा त्यांना या सिस्टीममधून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करावी. ग्रामीण भागात चांगली उपचाराची सोय उपलब्ध केल्यास सांगली, मिरजेवर त्याचा ताण पडणार नाही यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांना केल्या. 

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी यंत्रणा, मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यामुळे मुंबईतील डॉक्‍टर्स, नर्सिंग स्टाफला पाचारण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुंबईचे आयुक्त चहल यांना यंत्रणा देण्याची सूचना करणार आहे. ऑक्‍सिजन पुरवठा, व्हेंटिलेटर्सही उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जी यंत्रणा बाहेरुन मिळेल ती आणू. जिल्हाधिकाऱ्यांसोबत लवकरच जिल्ह्यात फिरणार आहे. सर्व यंत्रणेची पाहणी करुन माहिती घेऊ. नवीन मशीन खरेदी करु. कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड होत आहे. त्याला रोखण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करु, असे ते म्हणाले.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Tunnel Project : कोल्हापुरात भुयारी मार्ग होणार, शिवाजी स्टेडियम ते अंबाबाई मंदिरापर्यंत असणार भुयारी मार्ग

Call Scams : जर तुमच्या मोबाईलवर येत आहे सायलेंट फोन; तर सावध व्हा, नवा AI फ्रॉड करेल बँक खाते रिकामे, पाहा सुरक्षित कसे राहाल

"तो दारुडा, तुला सोडून देईल" प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईनेच केलेला लग्नाला विरोध; कोण आहे ही कलाकार ?

Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना समन्स? चौकशी होणार? SIT च्या रडारवर मोठं नाव! काय आहे ‘शिवनिका’ कनेक्शन

Accident Viral Video : आजोबा अन् २ नातवांना भरधाव 'थार'ने चिरडले, तिघांचाही जागीच मृत्यू; थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT