Strong verbal spat between the defense and the witnesses 
पश्चिम महाराष्ट्र

बचाव पक्ष-सक्षीदार यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी

शैलेश पेटकर

सांगली : बहुचर्चित अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांच्यासमोर सुरू आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे काम पाहत आहेत. दरम्यान, तत्कालीन पोलिस उपाधीक्षक डॉ. दीपाली काळे यांची साक्ष आज पूर्ण झाली.

बचाव पक्षाच्या वकिलांनी काळे यांचा उलट तपास घेतला. उलट तपासादरम्यान साक्षीदार काळे आणि बचाव पक्षाचे वकील यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. यामुळे न्यायालयात शांतता पसरली. बचाव पक्षातर्फे ऍड. प्रमोद सुतार, सी. डी. माने आणि गिरीश तपकिरे यांनी काम पाहिले. उद्या (ता. 24) रोजी पुन्हा या खटल्याची सुनावणी होणार आहे. 

लुटमारीच्या संशयावरून शहर पोलिसांनी अटक केलेल्या अनिकेत कोथळे याच्यावर अमानुषपणे थर्ड डिग्रीचा वापर केल्याने दि. 6 नोव्हेंबर 2017 रोजी पोलिस ठाण्यातच त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संशयितांनी अनिकेतचा मृतदेह आंबोली घाटातील निर्जनस्थळी जाळून खुनासारख्या गंभीर घटनेचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे आणि झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले या संशयितांच्या विरोधात खटला सुरू आहे. 

दरम्यान, सांगली शहरच्या तत्कालीन पोलिस उपाधीक्षक डॉ. काळे यांचा काल सरतपास न्यायालयासमोर नोंदवण्यात आला. त्यानंतर बचाव पक्षाने त्यांचा उलट तपास घेतला. काल ऍड. किरण शिरगुप्पे आणि विकास पाटील-शिरगावकर यांनी उलटतपास घेतला. पुन्हा बचाव पक्षाच्या वकिलांनी साक्षीदार काळे यांचा उलट तपास घेतला. बचाव पक्षाच्या वकिलांनी तांत्रिक मुद्द्यांवर भर दिला होता. उत्तरे देताना काळे यांची चांगलीच कोंडी झाली होती.

दरम्यान, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि बचाव पक्षाच्या वकिलांची जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. बचाव पक्षाच्या वकिलांनी स्टेशन डायरीतील नोंद, त्यातील वेगवेगळे हस्ताक्षर, देण्यात आलेली फिर्याद खोटी आहे आदी गोष्टींवर भर दिला. या दरम्यान साक्षीदार काळे आणि बचाव पक्षाचे वकील यांच्यातही जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील प्रमोद भोकरे, सीआयडीचे उपाधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले. सुनावणीवेळी अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले यांची उपस्थिती होती. 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT