heavy rain and wind sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : सलगरे परिसराला वादळी वाऱ्याचा फटका

घरावरील पत्रे उडाले, भिंत कोसळली; तिघे जखमी, बारा लाखांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

सलगरे : वादळी वाऱ्याने सलगरेत सुमारे १२ लाखांचे नुकसान झाले आहे. तीन नागरिक जखमी झाले. तीन दुभती जनावरेही जखमी व एक शेळी ठार झाली. काही घरांवरील पत्रे उडाले, तर द्राक्ष बाग, विजेचे खांब उन्मळून पडले. कुंडले व माळी वस्ती येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सायंकाळी सहाच्या दरम्यान अवकाळी पाऊस व सुसाट वादळी वाऱ्याने सलगरे गावच्या पश्‍चिमेला असणाऱ्या कुंडले वस्तीवरील विजय नामदेव कुंडले व विष्णू परशुराम कुंडले यांच्या घर व जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे सुमारे दीड किलोमीटरवर उडून पडले. मोठ्या प्रमाणात वारा आणि पाऊस पडत असल्याने घरांमध्ये ठेवलेले गहू, शाळू व मका या धान्यांची पोती भिजली. पत्रे उडून भिंतीवरील विटा, दगड अंगावर पडून तानाजी संभाजी कुंडले (वय ४६), राजाक्का नामदेव कुंडले (६०) व पांडुरंग मारुती पारेकर (३०) हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

या परिसरातील सव्वाशे यांच्या द्राक्षबागेतील पोल व झाडे उन्मळून बाग भुईसपाट झाली. या ठिकाणाहून नजीकच असलेल्या अमोल माळी यांच्या शेळीच्या अंगावर बाभळीचे झाड कोसळल्याने ती ठार झाली. वादळी वाऱ्याने विष्णू कुंडले यांच्या नवीन बांधलेल्या घरावरील पत्रे काही क्षणातच लोखंडी अँगलसह उचकटून दूरवर फेकले गेले. तसेच, विजेचे खांब व लहान-मोठी झाडे उन्मळून पडली. वाऱ्याने उडालेले पत्रे द्राक्षबागेवर पडल्याने द्राक्षबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या ठिकाणी आज सकाळी मंडलाधिकारी मिलिंद भंडारे, तलाठी कल्पना आंबेकर, कोतवाल सिद्ध लोहार यांनी पाहणी करून पंचनामे केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : 'काही तरी प्लॅनिंग सुरूय...' वडिलांना आधीच सावध केलं होतं; प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाचा मोठा दावा

Apple Pay आता भारतात सुरू; Axis Bankच्या कार्डधारकांना मिळणार सुविधा, जाणून घ्या कसं वापराचं

‘सारेगमप’चं शूटिंग संपवून ट्रेनने घरी निघाले, अन् पहिले पीरियड्स आले'; श्रेया घोषाल आठवण सांगत म्हणाली, 'वडिलांनी पॅड आणलं आणि..'

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

Uttarakhand: स्कूटी चालवून महिला कमावताहेत २० हजार रुपये! फ्लिपकार्ट, मिंत्रा ते ब्लिंकिट-स्विगीमध्ये संधी

SCROLL FOR NEXT