ST's ahmednagar division first in state 
पश्चिम महाराष्ट्र

"एसटी'च्या नगर विभागाने कात टाकली 

दौलत झावरे

नगर : "बहुजन हिताय, बहुजन सुखाय' या ब्रीदवाक्‍यानुसार एसटीचा कारभार सुरू असला, तरी प्रवाशांची संख्या कमी असल्याने एसटी प्रशासन तोट्यात आहे. ते नफ्यात यावे, यासाठी अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू असून, त्यामध्ये नगर विभागाचे काम वाखाणण्याजोगे आहे. नगर विभागातर्फे महिलांसाठी स्वतंत्र बस, पॅकेज टूर आदी उपक्रम राबवून प्रवासी वाढविण्यासाठी टाकलेले पाऊल कौतुकास्पद आहे. या उपक्रमांमुळे उत्पन्न, भारमान व कमी किलोमीटरमध्ये जादा उत्पन्न मिळविण्यात नगर विभाग राज्यात आघाडी घेणारा ठरला आहे. 

खासगी वाहनांकडे प्रवाशांचा कल जास्त दिसून येत आहे. नगर विभागाने खासगीकडील प्रवासी आपल्याकडे कसे आकर्षित होतील, यासाठी विभागनियंत्रक विजय गिते यांनी नवनवीन उपक्रम हाती घेऊन उत्पन्नवाढीवर अधिक भर दिला आहे. नगर विभागातील दोन विभागीय कार्यशाळा व अकरा बसस्थानकांच्या माध्यमातून जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील प्रवाशांना सेवा दिली जात आहे. यासाठी एकूण 787 बसेस आहेत. यामध्ये महिलांसाठी स्वतंत्र बस सुरू करणे, पर्यटन व देवदर्शनासाठी जाणाऱ्यांसाठी पॅकेज टूर आदी योजना सुरू करून प्रवासी आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याला आता जिल्ह्यातील प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच दिवाळीनिमित्त आणि पंढरपूर, आळंदी यात्रेनिमित्त जादा बसचे नियोजन केले. त्यांच्या या कष्टामुळे नगर विभागाच्या नफ्यात वाढ झाली असली, तरी ही वाढ कमी किलोमीटरमधील आहे. 

नगर विभागातील बस 
एकूण बस ः 787 
लाल बस ः 704 
निमआराम बस ः 42 
सीटर कम स्लीपर बस ः चार 
स्वमालकीच्या शिवशाही बस ः 22 
खासगी शिवशाही बस ः 15 

दिवाळीत मिळालेले उत्पन्न 
मागील वर्षीचे ः 31 लाख 78 हजार किलोमीटरमध्ये 11 कोटी 57 लाख 47 हजार. 
यंदाचे ः 31 लाख एक हजार किलोमीटरमध्ये 11 कोटी 63 लाख 35 हजार. 
भारमान ः मागील वर्षीचे ः 58.78, यंदाचे ः 61.21. 

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला सोडलेल्या बसचे उत्पन्न 
मागील वर्षी ः 220 बसच्या माध्यमातून तीन लाख 40 हजार किलोमीटरमध्ये एक कोटी आठ लाखांचे उत्पन्न मिळाले. 
यंदा ः 234 बसच्या माध्यमातून तीन लाख नऊ हजार किलोमीटरच्या माध्यमातून 99 लाख 42 हजारांचे उत्पन्न मिळाले. 

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रा 
मागील वर्षी ः 67 बसच्या माध्यमातून 56 हजार किलोमीटरमध्ये 17 लाख 98 हजारांचे उत्पन्न. 
यंदा ः 52 बसच्या माध्यमातून 57 हजार किलोमीटरमध्ये 17 लाख 35 हजारांचे उत्पन्न. 

आळंदी यात्रा 
मागील वर्षी ः 67 बसच्या माध्यमातून 56 हजार 867 किलोमीटरमध्ये 17 लाख 983 उत्पन्न. 
यंदा ः 72 बसच्या माध्यमातून 55 हजार 53 किलोमीटरमध्ये 17 लाख 47 हजारांचे उत्पन्न. 
भारमान ः मागील वर्षी 57 टक्के. यंदा 57 टक्के. 

महिलांच्या बसला 100 टक्के भारमान 
महिलांसाठी स्वतंत्र पुण्यासाठी बस सोडण्यात येत आहेत. या बसच्या माध्यमातून तीन फेऱ्या झाल्या आहेत. या बसने पुण्याला जाताना 100 टक्के भारमान मिळविले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

Magnesium & Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन-D ची पातळी कमी होण्यामागे असू शकतो 'या' खनिजांचा अभाव, 'हे' अन्नपदार्थ ठरतील उपयुक्त

SCROLL FOR NEXT