student sakal
पश्चिम महाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर पदव्युत्तर परीक्षा पुढे

विद्यार्थ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर राणी चन्नमा विद्यापीठाने (आरसीयु) पदव्यूत्तरच्या अंतीम वर्षातील परीक्षा चार दिवस पुढे ढकलल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : विद्यार्थ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर राणी चन्नमा विद्यापीठाने (आरसीयु) पदव्यूत्तरच्या अंतीम वर्षातील परीक्षा चार दिवस पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा मंगळवारी (ता.१४) पासून होणार होत्या. मात्र, विद्यार्थ्यांनी विद्यापीठ आवारात सोमवारी (ता. १३) आंदोलन केल्यामुळे या परीक्षा पुढे ढकलल्या असून सदरच्या परीक्षांना शुक्रवारी (ता.१७) पासून सुरुवात होणार आहे.

विद्यापीठाने गेल्या वीस दिवसांपुर्वी मागील सेमीस्टरच्या परीक्षा घेतल्या होत्या. महिनाभरातच पुन्हा अंतीम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे आयोजन केले जात असल्याने विद्यार्थ्यांतून नाराजी दिसून येत होती. मंगळवारपासून परीक्षा सुरु होणार होत्या. यावेळी ऑनलाईन वर्ग घेण्यात आले होते. तसेच ऑफलाईन परीक्षांचे आयोजन केले जात आहे. महिनाभरात दुसरी सेमीस्टर असल्याने विद्यार्थ्यांना मानसीक तयारी केलेली नव्हती. यामुळे परीक्षा रद्दची मागणी जोर धरू लागली होती.

विद्यापीठातील पदव्यूत्तरच्या विद्यार्थ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून आंदोलनाचे नियोजन केले होते. त्यानुसार सोमवारी विद्यापीठ आवारात आंदोलन करण्यात आले. दुपारी २ पर्यंत विद्यापीठ १४ तारखेपासूनच परीक्षा घेण्यावर ठाम होते. विद्यापीठाची भूमीका ऐकल्यानंतर विद्यार्थ्यांनी देखील कडक पवित्रा घेतला. यातील काही विद्यार्थ्यांनी आत्मदहनाचा इशारा विद्यापीठाला दिला. यासाठी रॉकेलचे दोन डबे विद्यार्थिनीनी आणले होते. यामुळे विद्यापीठाने सावध पवित्रा घेत चार दिवस परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय दिला. तत्पूर्वी कुलगुरुंनी काही विद्यार्थ्यांना आत बोलवून चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय देण्यात आला. आंदोलनासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने विद्यापीठ आवारात गर्दी केली होती.

प्रतिक्रिया

विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार फक्त पदव्यूत्तरच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. १७ तारखेपासून या परीक्षा नियमीत होतील. विद्यार्थ्यांना लवकरच परीक्षेचे नवीन वेळापत्रक दिले जाईल.

- डॉ. रामचंद्रगौडा, कुलगुरु, राणी चन्नमा विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT