counselors.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

विद्यार्थी-पालकांच्या मार्गदर्शनासाठी  जिल्ह्यात 8 समुपदेशक कार्यरत 

सकाळवृत्तसेवा

सांगली- "कोरोना' च्या पार्श्‍वभूमीवर शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद आहेत. विद्यार्थी आणि पालकांमध्ये शैक्षणिक परिस्थितीबाबत संभ्रम आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना करिअर आणि विविध समस्यांबाबत समुपदेशन करण्यासाठी शासनाने सांगली जिल्ह्यासाठी 8 समुपदेशक नियुक्त केले आहेत. 

"कोरोना' मुळे 14 मार्चपासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. पहिली ते नववी आणि अकरावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मात्र शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू होणार? यासह अनेक प्रश्‍न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहेत. त्यामुळे विद्यार्थी-पालक सध्या सर्वत्र चौकशी करत आहेत. त्यांच्यामध्ये संभ्रम आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन व समुपदेशनाची गरज आहे. त्यामुळे राज्य शासनाने जिल्हानिहाय समुपदेशक नियुक्त केले आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने जिल्ह्यात आठ समुपदेशक नियुक्त केले आहेत. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. आर.ए. होसकोटी, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू आहे. "डाएट' च्या अधिव्याख्याता डॉ. वैशाली भोई या जिल्हा समन्वयक म्हणून काक पाहत आहेत. 


जिल्ह्यातील समुपदेशक असे : संजय पाटील (राणी सरस्वती कन्याशाळा पेठभाग, मोबाईल 9730848074), रमेश हल्लोळी (राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील विद्यालय ढवळी, ता. वाळवा, 8928764275), संभाजी सरक (रामराव विद्यामंदिर जत, 9764601752), सरोज बाबर (आर.पी. पाटील विद्यालय कुपवाड, 9890777612), पांडुरंग गुरव (शहीद सुरेश चव्हाण हायस्कुल करोली टी, 9673469031), विकास कांबळे (भारतमाता विद्यालय, चिकुर्डे, 7798869092), संभाजी शिंदे (भवानी हायस्कुल आटपाडी, 9423809925), अण्णासाहेब भोसले (महात्मा गांधी विद्यालय तासगाव, 9730398216). 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT