student positive at Bedag; Swab of 38 students 
पश्चिम महाराष्ट्र

बेडगला विद्यार्थी पॉझिटिव्ह; 38 विद्यार्थांचे स्वॅब घेतले

निरंजन सुतार

आरग : बेडग (ता. मिरज, जि. सांगली ) मधील एका खासगी शिक्षण संस्थेच्या शाळेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या विद्यार्थ्याच्या संपर्कातील एकूण 38 विद्यार्थ्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. यामुळे गावातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता चार झाली आहे. सर्वांना होम क्‍वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिकुर्डेकर यांनी दिली.


हा विद्यार्थी कर्नाटकात होणाऱ्या एका राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यासाठी जाणार होता. स्पर्धेच्या नियमानुसार सर्वप्रथम त्याने कोरोना (आरटीसीपीआर) चाचणी करून घेतली. या चाचणीत त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर या विद्यार्थ्याच्या संपर्कातील एकूण 38 जणांचा कोरोना अहवाल तपासणीसाठी घेण्यात आला.

त्यातील 31 विद्यार्थ्यांचा रॅपिड एंटिजन टेस्ट अहवाल निगेटिव्ह आला आहे, तर अन्य सात विद्यार्थ्यांमध्ये सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे दिसून येत असल्याने त्यांच्या घशातील स्वॅबचे नमुने घेण्यात आले आहेत. लक्षणे असणाऱ्या सात जणांची कोरोना (आरटीसीपीआर) चाचणी केली आहे. त्याचा अहवाल दोन दिवसांनी येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. 


दरम्यान, बाधित विद्यार्थ्यांच्या वर्गातील इतर मुलांना कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. याशिवाय शालेय प्रशासनातर्फेही तातडीने शाळा व्यवस्थापन समिती व शालेय शिक्षकांची बैठक घेण्यात आली व शाळा शनिवारपासून (ता. 20) 14 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

आरोग्य विभागास संपर्क करा

कोरोना बाधित विद्यार्थ्यांच्या संपर्कातील विद्यार्थ्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. शाळेतील इतर विद्यार्थ्यांमध्ये कोणतीही लक्षणे आढळल्यास तपासणी करून घ्यावी व आरोग्य विभागास संपर्क करावा. सर्वांना होम आईसोलेटेड केले आहे. 
- डॉ. नितीन चिकुर्डेकर, वैद्यकीय अधिकारी, आरग 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी वाढ! चांदीही 3 लाखांवर; गुंतवणूकदार खुश, मात्र सर्वसामान्यांची चिंता वाढली; पाहा आजचा भाव

Kabanur Protest in Kolhapur : महापुरुषांच्या अवमानकारक वक्तव्यामुळे कबनूरमध्ये तणाव; संतप्त जमावाची इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडे धाव, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला धमकीचा मेल

Video : अरे, ही काय डोक्यावर पडलीय का? Hardik Pandya बाद होताच, गर्लफ्रेंड माहिका शर्माने काय केलं पाहा; नेटिझन्स संतापले

Stock Market Today: ट्रम्प टॅरिफला धक्का देत शेअर बाजार उसळला! सेन्सेक्स 400 अंकांनी वाढला; मात्र IDFC घसरला; कोणते शेअर्स तेजीत?

SCROLL FOR NEXT