vote-here 
पश्चिम महाराष्ट्र

अरेच्चा...27 वर्षांनंतर आलेलाही मुहूर्तही हुकलाच

तात्या लांडगे
सोलापूर : राजकीय क्षेत्रात पाऊल टाकण्यापूर्वी महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावर विद्यार्थ्यांचे नेतृत्व तयार व्हावे या उद्देशाने तत्कालीन युती सरकारने 27 वर्षांनंतर महाविद्यालय व विद्यापीठ निवडणुकीचा निर्णय घेतला. त्यानुसार विद्यापीठांना पत्रही पाठविण्यात आले मात्र, राज्यातील महापूर व विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करुन या निवडणुका नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. परंतु, त्यानंतर शासन स्तरावरुन काहीच निर्णय न झाल्याने या निवडणुकांचा मुहूर्त हुकला आहे.


आवश्‍य वाचाच...उपळाईच्या अनिता राज्यात प्रथम


राज्यातील साडेपाच हजार महाविद्यालयांमध्ये तब्बल 27 वर्षांनंतर महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये निवडणुका घेण्याचा निर्णय झाला. विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या निवडणुकांची विद्यार्थी संघटनांनी जोरदार तयारीही केली. मात्र, राज्यातील महापूर, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता यासह अन्य कारणांमुळे या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला. पुणे, सोलापूर, मुंबईसह अन्य विद्यापीठांसह त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयांनी मतदार यादीही तयार केल्या. बॅलेट पेपर होणाऱ्या या निवडणुका पुढे ढकलल्याने विद्यार्थी संघटनांनी नाराजी व्यक्‍त केली. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविद्यालयीन निवडणुकांच्या निकालाचा परिणाम विधानसभेवर होऊ नये या कारणाने निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. डिसेंबरपर्यंत या निवडणुका होतील, असा विश्‍वास बाळगलेल्या विद्यार्थी संघटनांची अपेक्षा फोल ठरली आहे.


हेही वाचाच...अरे वा...! सर्वात तरुण न्यायाधीश होण्याचा मान तोळणूरच्या आयेशाला

ठळक बाबी...
  • विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हुकला महाविद्यालयीन निवडणुकांचा मुहूर्त
  • 27 वर्षांनंतर विद्यार्थ्यांचे स्वप्न राहीले अपुरे : पुढे ढकलेल्या निवडणुकांचा निर्णय नाही
  • राज्यातील साडेपाच हजार महाविद्यालयांनी केली होती निवडणुकांची तयारी
  • तत्कालीन सरकारने घेतलेला निर्णय महाविकास आघाडी कायम ठेवणार का : विद्यार्थी संभ्रमात


हेही वाचाच...धक्‍कादायक 'या' शहरातील कोचिंग क्‍लासेसमधील विद्यार्थी असुरक्षित !


तयारी पूर्ण मात्र, शासन निर्णय नाहीच
उच्च शिक्षण विभागाने महाविद्यालयीन व विद्यापीठ निवडणुका घ्याव्यात असे पत्र दिले. मात्र, काही दिवसांनी विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहितेमुळे नोव्हेंबरपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय झाला. त्यानुसार सोलापूर विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांनी संपूर्ण तयारी केली होती. परंतु, पुढे काहीच निर्णय झाला नाही.
- डॉ. व्ही. बी. घुटे, कुलसचिव, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT