पश्चिम महाराष्ट्र

बससाठी विद्यार्थ्यांचे तासभर आंदोलन

अधिक बस सोडण्याची मागणी ; कुद्रेमानी गावातील विद्यार्थी

सतीश जाधव

बेळगाव : कुद्रेमानी (ता. बेळगाव) गावाला जाणाऱ्या बसला सायंकाळी शाळा-महाविद्यालय सुटण्याच्या वेळेला गर्दी होत आहे. यामुळे कुद्रेमानी गावातील विद्यार्थ्यांना सायंकाळी ५ च्या ऐवजी रात्री ७.३० बसने घरी जावे लागत आहे. यामुळे कुद्रेमानीला शाळेच्या वेळेत सकाळी २ व सायंकाळी २ बसेस अधिक सोडाव्यात, अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी युनियन जिमखान्याजवळ मंगळवारी (ता. २३) सायंकाळची बस थांबवून सुमारे तासभर आंदोलन केले.

बेळगाव शहरापासून २० किलोमीटर अंतरावर कुद्रेमानी गाव आहे. या ठिकाणचे विद्यार्थी बेळगावला शाळा व महाविद्यालयाला येतात. यामुळे या बसला नेहमी गर्दी असते. या भागातील बऱ्याचश्‍या विद्यार्थ्यांची शाळा ४.३० वाजता सुटते. तसेच त्यांना युनियन जिमखाना येथील बस थांब्यावर ४.३० पर्यंत बससाठी हजर रहावे लागते. यासाठी काही विद्यार्थी शिक्षकांना सांगून रोज ४ किंवा ४.१५ वाजता शाळेतून यावे लागते . यामुळे बसमुळे त्यांच्या शिक्षणावर देखील परिणाम होत आहे.

यासंबंधी कुद्रेमानी ग्रामस्थांनी अनेक वेळा परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. तरिही याकडे दुर्लक्षच करण्यात आले आहे. यामुळे गुरुवारी (ता. २४) पुन्हा परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले जाणार आहे. सीबीटीपासून कुद्रेमानीची बस आल्यानंतर चन्नमा सर्कलला पुर्ण क्षमतेने भरते. यामुळे युनियन जिमखान्याजवळ कुद्रेमानी गावातील असलेल्या विद्यार्थ्यांना इतर बसचा आसरा घ्यावा लागतो. यामुळे विद्यार्थ्यांना घरी जाण्यास खुप उशीर लागतो. रोज होणाऱ्या या प्रकाराला विद्यार्थ्यांनी कंटाळून बस समोर आंदोलन केले. आंदोनस्थळी विद्यार्थ्यांनी बसच्या समोर जावून आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप घेतल्यानंतर बस मार्गस्थ झाली. तरीही कुद्रेमानी गावातील अनेक विद्यार्थ्यांना त्या बसमधून जाता आले नाही. ते सायंकाळी उशीरापर्यंत बस थांब्यावर थांबून होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकशाही असावी तर अशी! “मत देणार नाही” म्हणणाऱ्या तरुणाला इटलीच्या पंतप्रधान मेलोनींनी दिलं असं उत्तर की विरोधकही झाले फॅन! Viral Video

Pune News: ‘जलजीवन’चे काम रखडल्याने टंचाईच्या झळा; मेदनकरवाडीकर तहानेने व्याकूळ, खासगी ४०० टँकरचा पाणीपुरवठा अपुरा!

सिलेंडरच्या तुटवड्यामुळे मराठी अभिनेत्रीवर आली हॉटेल बंद ठेवण्याची वेळ ! "अजून वर्षही नाही झालं आणि.. "

Ashok Kharat Case : सावधान! पीडित महिलांचे AI व्हिडिओ व्हायरल कराल तर जेलमध्ये जाल; नाशिक एसआयटी चा इशारा

Latur News: ‘भाकरीच्या चंद्राला’आता महागाईचा डाग; ज्वारी ५५ ते ६० रुपये किलो, उत्पादन क्षेत्र घटल्याने हुरडा पार्ट्यांवरही परिणाम

SCROLL FOR NEXT