karhad-school 
पश्चिम महाराष्ट्र

कऱ्हाडमधील तांबवे गावाची पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदत

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : स्वतः पुरग्रस्त असतानाही सामाजिक बांधीलकीतुन सांगली, कोल्हापुर येथील विद्यार्थ्यांच्या मदतीला तांबवे, दक्षिण तांबवे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी धावले आहेत. महापुराच्या विळख्यात आठवड्याहुन अधिक काळ राहिलेल्या तांबवे गावच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी सकाळने केलेल्या आवाहनानुसार शालेय साहित्य गोळा करुन ते सकाळ कार्यालयात जमा केले. 

तांबवे गावाला चारीबाजुने महापुराचे पाणी शिरुन गाव बेटासारखे झाले होते. गावातील अनेक घरात पाणी घुसले होते. त्याचबरोबर गावची शाळाही पाण्यात होती. त्यामुळे शाळेचे नुकसान झाले आहे. त्याचदरम्यान सांगली, कोल्हापुरमध्येही पाणी घुसुन त्या परिसरातील शालेय विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. त्या मुलांचे अश्रु पुसुन त्यांना शालेय साहित्य देण्यासाठी सकाळने शैक्षणिक साहित्य जमा करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

त्यामध्ये तांबवे आणि दक्षिण तांबवे शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या आवाहनानुसार पुरग्रस्त असल्याचे दुखः विसरुन तब्बल पाच हजार रुपयांचे शैक्षणिस साहित्य जमा केले. विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी त्यासाठी सहकार्य केले.  दक्षिण तांबवे शाळेतील मुख्याध्यापक मोहन शिणगारे, शिक्षक आबासाहेब साठे, सतीश सोनवणे, मनिषा साठे यांनी त्यासाठी परीश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वयाच्या पन्नाशीत गुन्हा, ३४ वर्षांनी ८४व्या वर्षी दोषी, आज शिक्षेची सुनावणी; आरोपीचा VIDEO VIRAL

माधुरी दीक्षित त्या कृतीमुळे झाली ट्रोल, उत्तर देताना म्हणाली...'कोणाचाही वाईट हेतू नव्हता पण...'

Latest Marathi News Live Update : काश्मीरमध्ये पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ

IND vs AFG, T20I: अफगाणिस्तान पहिल्यांदाच भारताचे आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी यजमानपद भूषवणार! कुठे होणार सामने?

Stock Market Today: इराणच्या निर्णयाचा शेअर बाजाराला फटका! सेन्सेक्स-निफ्टी घसरले, गुंतवणूकदारांनी काय करावे?

SCROLL FOR NEXT