Students wash their parents' feet and say thank you 
पश्चिम महाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी धुतले आई -बाबांचे पाय नि म्हणाले, थँक यू

सकाळ वृत्तसेवा

राहाता ः बाबा आमच्यासाठी खूप कष्ट घेतात. आई दिवसभर राबते, घर सांभाळते. आम्हाला चांगले शिक्षण मिळावे, प्रगतीची संधी मिळावी, आमचे जीवन सुखी व्हावे, यासाठीच हे दोघे मेहनत घेतात. त्यांच्या छत्रछायेमुळे आम्ही शाळेत शिकतो. याची आम्हा सर्वांना जाणीव आहे. तुमचे ऋण व्यक्त करण्यासाठी, तुमचे पाद्यपूजन करीत आहोत. तुम्ही आमचे सर्वस्व आहात. अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करीत येथील प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलातील दीडशे विद्यार्थ्यांनी माता-पित्यांचे आज पाद्यपूजन केले.

सनईच्या सुरावटीत कार्यंक्रम 
शाळेच्या पालक मेळाव्यात शेकडो पालकांच्या साक्षीने हा उपक्रम झाला. या विद्यार्थ्यांचे आई आणि वडील ओळीने मांडलेल्या पाटावर उभे राहिले. समोर रांगोळ्या रेखाटून, सुगंधी उदबत्त्या लावण्यात आल्या होत्या. काही विद्यार्थ्यांनी माता-पित्यांचे ऋण व्यक्त करणारे मनोगत व्यक्त केले. सनईच्या मंजूळ स्वरात या विद्यार्थ्यांनी एकाच वेळी आपल्या माता-पित्यांचे पाद्यपूजन केले.

प्रीतीपुष्पचे प्रकाशन 

याबाबत माहिती देताना शाळेचे संस्थापक प्राचार्य इंद्रभान डांगे म्हणाले, की दहावीच्या परीक्षेपूर्वी दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो. विद्यार्थ्यांना आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव व्हावी, हा हेतू त्यामागे असतो. या निमित्ताने "प्रीतिपुष्प' या पुस्तकाचे प्रकाशन प्राचार्य आनंद कटारिया, पालक सुरेश बोरस्ते व अविनाश पगार यांच्या हस्ते करण्यात आले. 

प्राचार्य ज्ञानेश डांगे, संचालिका पूनम डांगे, स्नेहलता डांगे, दत्तात्रेय सदाफळ, अधीक्षक शिवाजी देवडे, सचिन गिते, स्वाती धनवटे, अशोक गाढवे व रविकिरण पाटील उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray CJP protest : आदित्य ठाकरे निवडणूक आयुक्तांना थेट गद्दार म्हणाले, ‘गद्दार ज्ञानेश गेलेच पाहिजेत’; CJPच्या आंदोलनाला पाठिंबा

Pune News : पुणे महापालिकेचा कारभार 'रामभरोसे'; प्रमुख अधिकारी, पदाधिकारी परदेशात

Cockpit attack: 'मोठी किंमत मोजावी लागेल', कॉकपिट घटनेवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा इशारा

Alandi News : 36 विद्यार्थी सुखरूप आळंदीत परतले; पोलीस ठाण्यात पालकांच्या ताब्यात

Latest Marathi News Live Update : जेलमध्ये टाकलं तर… अभिजीत दिपके म्हणाले मी पुन्हा येईन

SCROLL FOR NEXT