पश्चिम महाराष्ट्र

विधानसभा पाहताना विद्यार्थी भारावले 

दत्ता उकिर्डे

राशीन : चिलवडी (ता. कर्जत) येथील श्री नागेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच विधिमंडळाच्या कामकाजाची माहिती घेतली. निमित्त होते "मुंबई दर्शन' सहलीचे. मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे पाहिल्यावर विद्यार्थ्यांनी विधिमंडळाला भेट दिली. आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांमध्ये मिसळून आनंद लुटला. विधिमंडळाच्या कामकाजाची माहिती दिली. 

"मिनी आमदार' होण्याचा हा अनुभव कायम स्मरणात ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व क्षण मोबाईलमध्ये कैद केले. गेल्या आठवड्यातही न्यू इंग्लिश स्कूल, अरणगाव, पाटोदा येथील विद्यार्थ्यांनी विधिमंडळाच्या कामकाजाबाबत आमदार पवार यांच्या उपस्थितीत सर्व माहिती जाणून घेतली होती. विद्यार्थ्यांना जागतिक दिनांचे महत्त्व सांगितले जाते, तसे ते महत्त्वपूर्ण दिन साजरेही केले जातात; मात्र एखाद्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना मतदारसंघातील अडचणी कशा सोडवायच्या, समाजघटकांना कसा न्याय दिला पाहिजे, या बाबी अनुभवताना विद्यार्थी हरखून गेले होते. पवार यांच्यासह शिक्षकांनीही "सेल्फी' घेत आगळावेगळा आनंद अनुभवला. 

कर्जत-जामखेडच्या जनतेला श्रेय 
आमदार रोहित पवार म्हणाले, ""राज्यातील सर्वोच्च सभागृहाचा सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली, त्याचं संपूर्ण श्रेय कर्जत-जामखेडच्या जनतेला आहे. त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना विधिमंडळाची ओळख आणि माहिती सांगताना मनापासून आनंद वाटला.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT