Study from home continues even after school closes 
पश्चिम महाराष्ट्र

शाळा बंद तरी स्टडी फ्रॉम होम सुरूच 

शिवाजीराव चौगुले

शिराळा, ता. 4 : "कोरोना' मुळे शाळा, महाविद्यालये कुलूपबंद आहेत. मुलांचे शिक्षण थांबले. लॉकडाऊन वाढला आहे. मुलांना अभ्यासात गुंतवून ठेवले तर कंटाळा कमी होईल. अभ्यासाची सवय राहिल. हा विचार मनात आला अन्‌ लॉकडाऊनमध्ये "स्टडी फ्रॉम होम' हा भन्नाट उपक्रम सुचला. विद्यार्थ्यांच्या पालकांचे व्हाट्‌सअप ग्रुप अथवा ब्रॉडकास्ट ग्रुप करून रोज सकाळी ग्रुपच्या माध्यमातून अथवा वैयक्तिक मेसेज पाठवून प्रत्येक इयत्तेचा अभ्यास पाठवायचा. सर्व इयत्तांचा अभ्यास बनवून पाठवणे एकट्याला शक्‍य नव्हते. हा प्रश्न सोडवला महाराष्ट्रातील तंत्रस्नेही शिक्षकांनी. 

शासनाचे दीक्षा ऍप महाराष्ट्रात शाळांत वापरले जाते आहे. या ऍपमध्ये सर्व इयत्तांचा अभ्यासक्रम व्हिडीओ स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आला आहे. तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने सर्व शैक्षणिक साहित्य शाळा, शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहे. SCERT तर्फे "शाळा बंद..पण शिक्षण आहे' ही अभ्यासमाला सुरू आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागदेखील विद्यार्थ्यांचे "ऑनलाईन स्वयंमूल्यमापन चाचणी' हा अभिनव प्रयोग राबवत आहे.

हजारो शिक्षक स्वतः प्रत्येक घटकांवर शैक्षणिक व्हिडिओ बनवत आहेत. पाठानुरुप व स्पर्धात्मक ऑनलाइन टेस्ट बनवत आहेत. PDF बनवत आहेत. अनेक शैक्षणिक ऍप विकसित केलेत. सर्व शैक्षणिक ज्ञानभांडार नेहमी विद्यार्थ्यांपर्यंत पाठवले तर शिक्षण प्रक्रिया ही लॉकडाऊनमध्येदेखील निरंतर सुरु राहील, अशी आशा आहे. 

यानुसार विद्यार्थ्यांना रोज सकाळी अभ्यास पाठवण्यास सुरुवात झाली. सक्ती न करता त्यांच्या सोयीनुसार सराव सांगण्यात आला. प्रविण व जयदीप डाकरे यांनी पहिली ते पाचवीसाठी नियमित दहा ते पंधरा ऑनलाईन टेस्ट बनवण्याचे ठरवले. नियमित अपडेट www.gurumauli.in संकेतस्थळावर देण्यास सुरवात झाली. या टेस्ट विद्यार्थ्यांबरोबरच महाराष्ट्रातील शाळांतील विद्यार्थ्यांनाही उपयोग व्हावा म्हणून वेगवेगळ्या व्हाट्‌सअप ग्रुपच्या माध्यमातून शेअर केले जात आहे.

महिन्याभरात संकेतस्थळाला जवळपास सव्वा चार लक्षहून अधिक भेटी कधी झाल्या समजलेच नाही. दिवसाला हजारो विद्यार्थी ब्लॉगवर ऑनलाईन टेस्ट सोडवत आहेत. "स्टडी फ्रॉम होम' हा उपक्रम खरोखरच यशस्वी ठरला. टेस्च सोडवलेल्या विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्स गुगल फॉर्मच्या सहाय्याने नोंदवले जात आहे. खंत याची होती, की ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्टफोन नाहीत, अशोंना उपक्रमापासून वंचित रहावे लागत होते. अशा विद्यार्थ्यांना बाजूच्या घरी फोन करून, एकमेकांना निरोप देऊन अभ्यास काय काय करायचा हे सांगण्यात आले. त्यांनाही प्रक्रियेत सामील करण्यात आले. 

जिल्हा परिषद स्तरावरून सर्वच माध्यमातून प्रयत्न

लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांची सध्याची मानसिकता काय असेल हे ओळखणे कठीण आहे. अजूनही शाळा कधी सुरू होतील याची कल्पना नाही. सध्यातरी खरी परीक्षा कोरोनाविरुद्ध लढण्याची आहे. प्रयत्न हाच आहे, की शिक्षण ही प्रक्रिया निरंतर सुरू रहावी. खंड न पडता सातत्य रहावे. शासन, जिल्हा परिषद सर्वच स्तरावरून "लर्निंग फ्रॉम होम' च्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत.

- प्रविण डाकरे, प्रा. शिक्षक, कुंडलवाडी, ता. वाळवा, जि. सांगली 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT