Satish Jarkiholi sakal
पश्चिम महाराष्ट्र

पोलीस उपनिरीक्षक भरती गैरव्यवहार प्रकरण सीबीआय कडे सुपूर्द केले जावे : सतीश जारकीहोळी

पोलीस उपनिरीक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणात राजकारणी, वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी असल्याचे स्पष्ट

विनायक जाधव

बेळगाव : पोलीस उपनिरीक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणात राजकारणी, वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हे प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सुपूर्द केले जावे, अशी मागणी कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केली.

गोकाक येथील हिल गार्डन कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली.‌ या घोटाळ्यात पोलीस अधिकारी देखील सहभागी झाली आहेत. त्यामुळे सरकारने पोलिसांकडूनच हा तपास करणे कितपत योग्य आहे?, असा सवाल श्री. जारकीहोळी यांनी यावेळी उपस्थित केला. एकच परीक्षा केंद्रावर परीक्षा लिहिलेले अनेक उमेदवार यात पास झाले आहेत. त्यासाठी ब्लूटूथचा वापर देखील करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची प्रामाणिक चौकशी करून यात सहभागी असलेल्यांवर योग्य कारवाई होणे आवश्यक आहे.

पोलीस उपनिरीक्षक भरती प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहारात वरिष्ठ पोलीस अधिकारी, मंत्री आणि आमदारांची नावे पुढे येत आहेत. माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाचे नाव देखील यात आता ऐकू येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे. दिव्या हागरगी यांना काँग्रेसने लपवून ठेवण्यासाठी ते लहान मुलं नव्हेत. भाजपच्या वरिष्ठ पदावर त्या ओळखल्या जातात, असे भाजपला प्रत्युत्तर दिले.‌

विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या हे ७ व ८ मे रोजी बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील विविध मतदारसंघात खासगी कार्यक्रमात भाग घेणार असून त्यांच्या सोबत आपणही असणार आहे. तर केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार हे ७ मे रोजी बेळगाव काँग्रेस भवनमध्ये विधान परिषद नैऋत्य पदवीधर मतदारसंघ निवडणुकीबाबत बेळगाव शहर, ग्रामीण, चिकोडी, विजापूर, बागलकोट जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची सभा घेणार असल्याची माहिती यावेळी श्री. जारकीहोळी यांनी पत्रकारांना दिली.

-विनायक जाधव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

आजचे राशिभविष्य - 26 सप्टेंबर 2026

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT