IMG-20200229-WA0006.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

मांजराच्या पिल्लावर यशस्वी नेत्रशस्त्रक्रिया 

सकाळवृत्तसेवा

सांगली ः तीन-चार महिन्यांच्या मांजराच्या पिल्लू. अज्ञात कारणातून त्याच्या उजव्या डोळ्याला गंभीर मार लागला. डोळा निकामी झाला आणि जगण्यासाठी त्याची धडपड सुरू झाली. सजग नागरिकांनी त्याला ऍनिमल सहारा फौंडेशनच्या कार्यकर्त्यांकडे सोपवले. त्याच्याव ऍनिमल राईट फंडच्या माध्यमातून नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया झाली.

आता त्याचा पुर्ण डोळाच काढून टाकला असून दुसऱ्या डोळ्यावरच त्याची आता भिस्त आहे. महिनाभराच्या उपचाराअंती आता त्याला दत्तक देण्यात देऊन पुनर्वसन झाले. 

पंचशीलनगरमध्ये मांजराचे तीन-चार महिन्याचे पिल्लू निर्मला साळुंखे यांच्याकडे होते. अज्ञात कारणातून त्याच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. जखमी इतकी मोठी झाली. जगण्याची धडपड सुरू असताना ऍनिमल सहारा फौंडेशनचे अजित काशीद, पुष्पा काशीद यांच्याकडे ते पिल्लू देण्यात आले.

त्यांनी ऍनिमल राईट फंडचे व्यवस्थापक राहुल पाटील यांच्या मदतीने त्या मांजराची शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले. डोळा पुर्ण निकामी झाल्याने काढून टाकण्याचा निर्णय डॉक्‍टरांनी घेतला. त्यानुसार पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांनी डॉक्‍टरांच्या देखरेखीत उपचार घेण्यात आली.

पंधरा दिवसानंतर ते मांजराचे पिल्लू पुन्हा खेळू लागले. निर्मला साळुंखे यांनी त्याला दत्तक घेवून आपल्या घरी नेले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नापिकी, भावही नाही अन् कर्जाचं ओझं वाढलं, शेतकरी दाम्पत्यानं घेतला विषाचा घोट; पतीचा मृत्यू, पत्नीची मृत्यूशी झुंज

Jayakwadi Dam: पैठण व माजलगाव तालुके धोक्याच्या छायेत; धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने गोदाकाठची गावं संकटात

Pune Rain News : पुण्यात ११ तासांपासून मुसळधार पाऊस, नागरिकांचे हाल; सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Kalu Waterfall Accident : काळू धबधब्याजवळ दरड कोसळून दुर्घटना, २३ वर्षीय इंजिनिअरचा मृत्यू;

मंदिरात लग्न, गर्भपात अन् MBBS विद्यार्थिनीचा गूढ मृत्यू; मुलीच्या तोंडातून येत होता फेस, दोन डॉक्टरांची धक्कादायक प्रेमकहाणी

SCROLL FOR NEXT