सांगली-यंदा अगदीच प्रतिकुल परस्थितीतून तयार झालेल्या गुणवत्तापूर्ण द्राक्ष चांगलाच भाव खाताहेत. प्रतिकिलो 80 ते 110 रुपये किलो दरांना स्थिनिक तसेच परदेशात द्राक्षाची विक्री सध्या सुरु आहे. विशेषतः जिल्ह्यातील सोनी, मणेराजुरी परिसरातील द्राक्षांना दर उत्पादकांना चांगले दर मिळत असल्याचे चित्र आहे.
आगाप द्राक्ष हंगाम घेणारे शेतकरी अडचणीत आले होते. परिणामी यंदाचा हंगामाला गती येण्यास जानेवारी अखेर उजडावा लागला आहे. सध्या द्राक्षांना मागणी आणि दरही तेजीत आहेत. गेल्या चार दिवसापासून थंडी कमी झाल्यामुळे दलालांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदीही सुरु झालेली आहे. अवीट गोडी, जिभेला सुंदर स्वादाचा आनंद देणारी द्राक्षे बाजारात उपलब्ध होत आहेत. यंदा किमान तीस-चाळीस टक्के द्राक्ष बागा विविध कारणांनी वाया गेल्यामुळे दरातील तेजीस कारण ठरताहेत.
गेल्या दोन वर्षात स्थानिक बाजारात मिळणारे दरही चांगले आहेत. अगदी निर्यातक्षम द्राक्षापेक्षाही अधिक दर स्थानिक व्यापाऱ्यांकडून दिले जात आहेत. मध्यम द्राक्षाचे सरासरी दर यंदा 50 रुपये किलो असेच राहतील, असा उत्पादकांना विश्वास वाटतो आहे. प्रत्येक जातीनुसार दर मिळताहेत. तरीही गेल्या दोन वर्षीपेक्षा दर यंदा तुलनात्मक तेजीतच आहेत.
एसएसएन, सुपर सोनाका, थॉमसन, कृष्णा, सोनाका, माणिक चमन, अनुष्का, सुपर सीडलेस, गोविंद, मधुर जातीच्या द्राक्षांना जगभरात मागणी असते. नाशिक जिल्ह्यातील पाऊस, प्रतिकूल हवामानाचा फटका बसल्याने तिकडील द्राक्षे यंदा उशिराच बाजारात दाखल झाली आहेत.
एक दृष्टीक्षेप...
0 जिल्ह्यातील द्राक्ष -1 लाख 20 हजार एकर
0 फेब्रुवारीत विक्रीस येणारी द्राक्ष -40 हजार एकर
.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.