Such support was given to the families in Sangli sangli marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीतील त्या कुटुंबाना मिळाला प्रशासनाचा असा आधार....

विजय लोहार

नेर्ले (सांगली) : येथील तीन महिन्यांपुर्वी शेतात विहीर काढण्यासाठी अहोरात्र धडपड करणाऱ्या व दगडं फोडून आयुष्य कंठनाऱ्या कर्नाटक येथुन आलेल्या झोपडीतल्या कुटुंबाना महसूल विभाग सांगली यांचेकडून आलेले धान्याचे किट या महिला मजूरा पर्यंत पोहोच केले.त्यामुळे  आपल्या बायका मुलांसह राबणाऱ्या संसारात लागणाऱ्या तेल, मीठ, चटनीची व्यवस्था झाल्यामुळे या मजूर कष्टकरी महिलानी महसूल अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी धान्य घेनाऱ्याच्या व देनाऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

17 जणांचा प्रश्न लागला मार्ग

नेर्ले गावच्या हद्दीत महामार्गाच्या पश्चिम दिशेला 'घोलाची शेती' म्हणून प्रसिद्ध आहे .या भागात कर्नाटक येथील कामासाठी आलेल्या लहान मुला बाळा सह 17 जणांच्या पोटाचा प्रश्न ऐरणीवर आला होता.सांगली जिल्हा महसूल प्रशासन  त्यांच्या झोपडी पर्यंत पोहोचले. डाळ, तांदूळ, साखर, पीठ, मीठ, चहा पावडर, तेल साबण अशा एक ना अनेक संसार उपयोगी वस्तू या मजुरांना मिळाल्या त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर घामाच्या धारा ऐवजी आनंदाची लकेर उमटली.

 महसूल विभागाचे असेही योगदान

सांगली जिल्हा महसूल विभागाच्या वतीने एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही या उद्देशाने उपेक्षित व्यक्तींना व कुटुंबांना हे धान्य पोहोच करण्याचे काम तालुकास्तरावरील महसूल विभाग करीत आहे. यावेळी पेठ भागांत देखील गरीब कुटुंबाना धान्य किट वाटप करण्यात आले. पेठ मंडल अधिकारी सुरेश शेळके मंडल अधिकारी पेठ पंडीत चव्हाण नेर्ले, तलाठी राहुल काळे पेठ,विजय रोकडे उपस्थित होते.प्रांताधिकारी नागेश पाटील,तहसीलदार रवींद्र सबनीस यांचे सहकार्य लाभले.महसूल विभाग सांगली अशा गरजू कुटुंबाचा शोध घेत त्यांच्यपर्यंत धान्य पोहोचवायचे काम करीत आहे.सामाजिक कार्यकर्ते यांचे माध्यमातून योग्य कुटुंबाला धान्य मिळत असल्याने लोकांतून समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT