sucide case in temple in ichalkaranji 
पश्चिम महाराष्ट्र

मंदिराच्या गाभाऱ्यातच 'त्याने' केली आत्महत्या

राजेंद्र होळकर

इचलकरंजी : इचलकरंजी येथील आयजीएम सामान्य रुग्णालयाजवळील गोंधळी गल्ली मधील संतुबाई नागबंद मंदिराच्या गाभाऱ्यात एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. संभाजी राजाराम धुमाळ (वय 48 रा.केटकाळे नगर ) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिस ठाण्यातून याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, येथील गोंधळी गल्लीमध्ये संतुबाई नागबंद मंदिर आहे. यामंदिरामध्ये मृत संभाजी नेहमी यायचा. तो गेल्या दोन दिवसापासून या मंदिरात राहत होता. मंगळवारी (ता.17) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मंदिराच्या पुजाऱ्यांने मंदिर बंद केले. यावेळी संभाजी मंदिरामध्ये झोपला होता.

आज सकाळी (ता.18) नेहमीप्रमाणे मंदिराचा पुजारी कुमार धुमाळ मंदिर उघडण्यासाठी आले. त्यावेळी त्याना संभाजी याने मंदिराच्या गाभाऱ्यात गळफास घेवून आत्महत्या केल्याची दिसले. या घटनेबाबत पुजारी धुमाळ यांनी पोलिसांना माहिती दिली. यावरुन शिवाजीनगर पोलिसांनी मंदिराकडे धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून, मृतदेह शवविच्छेदनासाठी आयजीएम सामान्य रुग्णालयामध्ये पाठविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT