Belgaum : अवकाळीने ऊस तोड मजुरांचे हाल  sakal media
पश्चिम महाराष्ट्र

Belgaum : अवकाळीने ऊस तोड मजुरांचे हाल

झोपडी परिसरात पावसाचे पाणी; बसूनच दिवस काढण्याची वेळ

सकाळ वृत्तसेवा

चिक्कोडी :चिक्कोडी तालुक्यात सीमाभागाच्या आजूबाजूच्या गावातील रस्त्याकडेला आणि रिकाम्या असलेल्या जागेत ऊसतोड मजुरांनी आपल्या झोपड्या उभारल्या आहेत. तेथे वास्तव्य करून सुमारे दीड महिन्यापासून आपल्या जीवनाचा संसार गाडा चालवित आहेत. परंतु विश्रांती घेतलेल्या अवकाळी पावसाने दोन-तीन दिवसांपासून हजेरी लावल्याने झोपडीच्या परिसरात पाणी साचले आहे. परिणामी परिसर चिखलमय झाल्याने ऊसतोड मजुरांना झोपडीत बसून राहण्याची वेळ आली आहे. शेतात पाणी राहिल्याने ऊसतोड बंद झाली आहे. असे झाल्यास आपला जीवनाचा गाडा कसा, चालवावा असा, प्रश्न ऊसतोड मजुरांना पडला आहे.

बुधवारी रात्रीपासून चिक्कोडी तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे ऊसतोड मजुरांच्या झोपडीच्या भागात पाणीच पाणी झाले होते. जीवनावश्यक वस्तूंसह धान्य व्यवस्थितरित्या ठेवण्यासाठी मजुरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. तर काही मजुरांना रात्री विश्रांती घेण्यासाठी शाळा आवारात किंवा अन्य ठिकाणी जावे लागले. तालुक्यात ऊस पीक जास्त असल्याने जोमाने तोडणी सुरू होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने ऊसतोड बंद झाली आहे. जीवन जगण्यासाठी ऊसतोड मजूर इतर राज्यातून आपल्या कुटुंबासमवेत आले आहेत. गेल्या पंधरा दिवसापासून होत असलेले ढगाळ वातावरण आणि पावसामुळे त्यांना अनेक समस्या निर्माण होत आहेत.

परिस्थिती पूर्वपदावर कधी येईल

महाराष्ट्रातील बीड, उस्मानाबाद, जत, पंढरपूर, विजापूर जिल्ह्यातील अनेक कर्मचारी ऊसतोडीवर अवलंबून आहेत. त्यामुळे ते आपल्या कुटुंबासमवेत अन्य जिल्ह्यात येतात. अवकाळी पाऊस ऊसतोड मजुरांसह कारखानदारांना डोकेदुखी ठरत आहे. एकूणच शेत, रस्ते आणि रिकाम्या जागेत पाणी साचल्याने परिसर चिखलमय झाला आहे. पाऊस कमी होऊन परिस्थिती पूर्वपदावर कधी येईल, असा प्रश्‍न मजुरांमधून उपस्थित होत आहे.

"गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरणासह मुसळधार पाऊस पडल्याने आमचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. गावाहून आणलेल्या धान्यांची नासाडी झाली आहे. सध्या हालाखीचे दिवस आलेले आहेत."

-रोहिदास राठोड, ऊसतोड मजूर, बीड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

Pune Drone Cluster: पुण्यात ड्रोन अन् खाद्यप्रक्रिया क्लस्टर; राज्यातील पहिलाच उपक्रम, भोसरी, हडपसरमध्ये सुरू होणार प्रकल्प!

Pandharpur News: पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉरला तीव्र विरोध; सुब्रह्मण्यम स्वामींच्या मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी बाधितांचा शंखनाद!

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

SCROLL FOR NEXT