Sugar mills 'FRP' certified; curiosity increased about prices
Sugar mills 'FRP' certified; curiosity increased about prices 
पश्चिम महाराष्ट्र

साखर कारखान्यांची "एफआरपी' प्रमाणित; दराबाबत उत्सुकता वाढली

घनशाम नवाथे

सांगली : जिल्ह्यातील पंधरा साखर कारखान्यांची धुराडी यंदा पेटली आहेत. परंतु अतिवृष्टीमुळे ऊसतोड कशी करायचे याचे संकट निर्माण झाले आहे. आणखी काही दिवसांनी हंगाम तेजीत सुरू होईल. साखर आयुक्त कार्यालयाकडून कारखान्यांची "एफआरपी' प्रमाणित करण्यात आली आहे. त्यापेक्षा अधिक दर किती मिळणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे. 

गतवर्षी ऊसदर जाहीर न करताच जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू झाले होते. महिनापेक्षा जास्त काळ उलटला तरी कारखान्यांनी दर जाहीर केला नव्हता. तर कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी मात्र तेव्हा एकरकमी एफआरपी जाहीर केली. गतवर्षी दुष्काळ, महापूर आणि अतिवृष्टीचा सामना ऊस कारखानदारीशी संबंधित क्षेत्राला करावा लागला. ऊसाचे क्षेत्र घटल्यामुळे गतवर्षी गाळप कमी आणि साखर उत्पादनही घटले. यंदा ऊस क्षेत्र जास्त असून साखर उत्पादनही जास्त होईल असे चित्र आहे. गतवर्षी 12 साखर कारखाने सुरू होते, यंदा 15 कारखान्यांनी परवाना घेतला आहे. 

साखर कारखान्यांनी धुराडी नुकतीच पेटली होती. परंतु अतिवृष्टीमुळे उसात पाणीच-पाणी झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते. त्यामुळे कारखान्यांनी रस्त्याकडेचा ऊस तोडण्यास प्रारंभ केला आहे. तर काही कारखान्यांना वाट पहावी लागत आहे. यंदाही ऊस दर जाहीर न करताच कारखाने सुरू झाले आहेत. तर साखर आयुक्त कार्यालयांकडून कारखान्यांची प्रमाणित "एफआरपी' जाहीर झाली आहे. आणखी काही दिवसांनी हंगाम तेजीत सुरू होईल. तत्पूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतरांच्या ऊस परिषदेतील दर मागणीकडे लक्ष लागले आहे. स्वाभिमानीची ऊस परिषद 2 नोव्हेंबरला होणार आहे. त्यानंतर साखर कारखानदार, शेतकरी संघटना आणि प्रशासनाच्या बैठकीतून दरावर तोडगा निघू शकतो. 

कारखान्यांची "एफआरपी' गतवर्षीच्या उत्पादन खर्च आणि नफा आदींवर आधारित प्रमाणित केली आहे. परंतु त्यापेक्षा अधिक दर किती मिळणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच एकरकमी एफआरपी यंदा मिळणार काय? याबाबतही उत्सुकता असणार आहे. 

कारखान्यांची प्रमाणित "एफआरपी' 

कारखाना साखर उतारा तोडणी व वाहतूक (रु.) निव्वळ एफआरपी (रु.) 
दत्त इंडिया 12.54 683.56 2891.51 
राजारामबापू साखराळे 12.90 600.81 3075.69
विश्‍वास 12.82 610.23 3043.47
हुतात्मा 12.68 519.50 3094.30
राजारामबापू वाटेगाव 12.77 609.70 3029.73
तासगाव 00 550.00 2650.00
राजारामबापू- जत अप्राप्त अप्राप्त अप्राप्त
सोनहिरा 13.35 629.82 3174.93
क्रांती 12.47 569.95 2984.00
राजारामबापू-सर्वोदय 12.76 586.57 3050.03
मोहनराव शिंदे 11.12 615.00 अप्राप्त
निनाईदेवी-दालमिया 13.39 अप्राप्त अप्राप्त
यशवंत 9.94 550.00 2300.00
उदगिरी शुगर 12.35 636.77 2882.98
सद्‌गुरू श्री श्री 10.93 अप्राप्त अप्राप्त

संपादन :  युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT