पश्चिम महाराष्ट्र

हक्काचा साखर कारखाना बंद असल्यावर काय होते? शेतकऱ्यांची परवड... 

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी सहकारी साखर कारखान्याचे धुराडे बंद पडल्याने सभासदांच्या ऊस गाळपाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील इतर कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही विठ्ठल परिवारातील शेतकऱ्यांचा ऊस मात्र अजूनही बांधावरच आहे. ऊस शेतात उभा असल्याने विठ्ठलच्या सभासदांची परवड सुरू आहे. कासेगाव (ता. पंढरपूर) येथे सुमारे तीनशेहून अधिक एकरावरचा ऊस तोडणी अभावी शेतात उभा आहे. अनेक कारखानदारांसमोर हात जोडूनही उसाला तोड मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. 

विठ्ठल कारखान्याचे संचालक विजयसिंह देशमुख हे एकमेव सभासदांच्या ऊस गाळपासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु, त्यांचेही प्रयत्न आता अपुरे पडू लागले आहेत. अडचणीत सापडलेल्या विठ्ठल परिवारातील शेतकरी सभासदांवर कोणी ऊस.. नेता का ऊस... अशी म्हणण्याची दुर्दैवी वेळी आली आहे. दुष्काळ आणि महापूराचा फटका बसला असला, तरी पंढरपूर तालुक्‍यात यावर्षी उसाचे क्षेत्र मोठे आहे. अशातच विठ्ठल, सहकार शिरोमणी, सीताराम आणि भीमा हे चारही साखर कारखाने आर्थिक अडचणींमुळे बंद पडले आहेत. कारखाने बंद राहिल्याने कारखान्याच्या सुमारे 60 हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

विठ्ठल कारखान्याचे तालुक्‍यात सभासद संख्या आणि ऊस क्षेत्र मोठे असल्याने कारखान्याच्या सभासदांना मोठी किंमत मोजण्याची वेळ आली आहे. यावर्षी जिल्ह्यातील काही मोजके साखर कारखाने सुरू आहेत. यामध्ये पांडुरंग, युटोपीयन, दामाजी, सहकारमहर्षी, विठ्ठलराव शिंदे या कारखान्यांचा समावेश आहे. प्रत्येक कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसाचे क्षेत्र असल्याने विठ्ठल, सहकार शिरोमणी आणि भीमा कारखान्याच्या सभासदांचा ऊस शेतात तसाच शिल्लक आहे. ऊस तोडणीची कालमर्यादा संपल्याने उसाचे नुकसान सुरू झाले आहे. मागील वर्षीच्या दुष्काळामुळे आधीच शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यात कारखाने बंद पडल्याने ऊस गाळपाचा प्रश्‍न निर्माण झाला. हक्काचे कारखाने बंद झाल्याने शेतकऱ्यांना इतर कारखान्यांच्या भरवशावर अवलंबून राहावे लागत आहे. तरीही वेळेत ऊस तोडणी होत नसल्याने नुकसानीत वाढ झाली आहे. तालुक्‍यातील कासेगाव सह तालुक्‍यातील अनेक गावात ऊस तोडीचा प्रश्‍न आ वासून उभा राहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT