Suicide anger over not buying duke bike belgaum sakal
पश्चिम महाराष्ट्र

DUKE BIKE खरेदी करुन न दिल्याच्या रागातून आत्महत्या

पालकांनी ड्यूक मोटर सायकल खरेदी करुन न दिल्याच्या रागातून तरूणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : पालकांनी ड्यूक मोटर सायकल खरेदी करुन न दिल्याच्या रागातून तरूणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवार (ता. १६) सकाळी आझादनगर येथे ही घटना उघडकीस आली असून अरीन अफजल मुल्‍ला (वय १८, मूळ राहणार होसपेटी गल्ली चिकोडी सध्या रा. आझादनगर) असे त्याचे नाव असून घटनेची नोंद माळमारुती पोलिस ठाण्यात झाली आहे.

मुल्ला कुटुंबीय मूळचे चिकोडी येथील राहणारे असून ते गेल्या काही वर्षापासून आजादनगर येथे वास्तव्यास आहेत. अरीन हा मला ड्यूक मोटर सायकल घेऊन द्या अशी मागणी गेल्या काही दिवसापासून पालकाकडे सातत्याने करत होता. मात्र, पालकांनी त्याला मोटरसायकल घेऊन दिली नाही. त्यामुळे रागाच्या भरात रविवार (ता.१५) रात्री त्याने राहत्या घरी बेडरुमच्या फॅनाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर माळमारुतीचे पोलीस उपनिरीक्षक व्हनाप्पा तळवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. जिल्हा रुग्णालयातील शवागृहात शल्यचिकित्सा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT