Suicide Incidence In Itavade Khurd Sangli Marathi News  
पश्चिम महाराष्ट्र

धक्कादायक ! मित्राला फॅक्टरी काढण्यासाठी केलेली मदत बेतली जिवावर

सकाळ वृत्तसेवा

ऐतवडे खुर्द ( सांगली ) - मिरज येथील मित्राला हळद फॅक्‍टरी टाकण्यासाठी वडिलांच्या नावावर काढून दिलेले कर्ज मित्राने न भरल्याने ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील बाबासाहेब पांडुरंग पाटील (वय ४०) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची फिर्याद संभाजी यशवंत पाटील यांनी कुरळप पोलिसात दिली आहे.

बाबासाहेब पाटील यांनी २००३ मध्ये त्यांच्या मित्राला वडिलांच्या नावे सात लाख रुपये कर्ज काढून दिले होते. त्या कर्जाचा कोणताही हप्ता त्या मित्राने न भरल्याने त्याची रक्कम व्याजासह ५१ लाख रुपये झाली आहे. या बाबत बाबासाहेब पाटील यांनी त्या मित्राला वेळोवेळी कल्पना देऊनही त्याने कर्जाचे हप्ते भरण्यास टाळाटाळ केली होती. जुलै महिन्यात बॅंकेकडून थकीत कर्ज भरण्यासाठी नोटीस आली होती. त्यानंतर परत वारंवार मित्राकडे जाऊन कर्ज भरण्याची विनंती पाटील यांनी केली.

पैसे भरण्यास टाळाटाळ

मित्राने स्टॅंपवर ‘मी हे पैसे घेतले आहेत, पैसे भरण्याची जबाबदारी माझी आहे, लवकरच ते पैसे भरू’ असे लिहून दिले. त्यानंतर बॅंकेचे कर्मचारी कर्ज भरावे म्हणून वारंवार घरी येत होते. मित्राला याची कल्पना देऊनही त्याने पैसे भरण्यास टाळाटाळ केली होती. या सर्वाला कंटाळून दुपारी साडे बाराच्या  सुमारास बाबासाहेब पाटील यांनी शेतातील जनावरांच्या शेडमधील आड्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने ऐतवडे खुर्द परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बाबासाहेब पाटील यांच्या पश्‍चात पत्नी, दोन  लहान मुले, वृद्ध वडील असा परिवार आहे. या बाबत बाबासाहेब पाटील  यांचे चुलत बंधू संभाजी पाटील यांनी कुरळप पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुरळप पोलिसांनी अज्ञात कारणातून गळफास घेऊन आत्महत्या अशी नोंद केली आहे. 

कर्जमाफीत माफ होईल का ?

कर्जमाफीत माझे कर्ज माफ होईल का, याबाबत बाबासाहेब पाटील गेल्या काही दिवसांपासून अनेकांना विचारणा करीत होते. मात्र, शनिवारी दोन लाख कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर बाबासाहेब पाटील निराश होते. अखेर आज त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वतः लाटते पोळ्या, मोदकही बनवते, 'या' ठिकाणी आहे मराठी अभिनेत्रीचं हॉटेल; मेन्यू सांगत म्हणाली- गणपतीत...

Ganeshotsav news: चिंचवडगावात गणेशोत्सवाची धामधूम; जिवंत देखावे, ‘स्पेस गॅलेक्सी’ संकल्पनेतून सामाजिक संदेश .

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

SCROLL FOR NEXT