Sangli Police Wasim Attar esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Police : ड्यूटीवरून घरी परतल्यानंतर सांगलीतील पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या; काय आहे कारण?

वसीम अत्तार (Wasim Attar) हे चार महिन्यांपूर्वी शहर पोलिस ठाण्यात बदलीने रुजू झाले होते.

सकाळ डिजिटल टीम

तरुण पोलिस अंमलदाराने आत्महत्या केल्याने पोलिस वर्तुळात शोक व्यक्त केला गेला.

सांगली : शहर पोलिस ठाण्यातील (Sangli Police Station) पोलिस अंमलदार वसीम मुसा अत्तार (वय ४२, रा. मुजावर प्लॉट, बसस्थानक परिसर, सांगली) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. काल (सोमवार) सकाळी हा घटना उघडकीस आली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की वसीम अत्तार (Wasim Attar) हे चार महिन्यांपूर्वी शहर पोलिस ठाण्यात बदलीने रुजू झाले होते. यापूर्वी ते महात्मा गांधी पोलिस चौकीत कार्यरत होते. काल ते ड्यूटीवरून घरी परतले होते. त्यानंतर त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

काल सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर तातडीने शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र तरुण पोलिस अंमलदाराने आत्महत्या केल्याने पोलिस वर्तुळात शोक व्यक्त केला गेला. पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्यासह ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी शोक व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT