Sunil Kale was killed by a sharp beating in yelur sangli marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

तो सोडत होता वैरणीचा बिंडा, तेवढ्यात यांनी केला त्याचा गेम....

सकाळ वृत्तसेवा

सागंली - येलूर (ता. वाळवा) येथे सुनील ऊर्फ सोन्या प्रकाश काळे (वय ३६) यांचा धारदार विळ्याने वार करून अज्ञातांनी खून केल्याची घटना आज सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. हा खून अनैतिक संबंधातून दोन ते तीन मारेकऱ्यांनी केला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे.  

अनैतिक संबंधातून घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज 

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या येलूर ते तांदूळवाडी सेवा रस्त्यावर पूर्व बाजूस काळे वस्ती आहे. सुनील काळे हे दुचाकी (एम. एच. १० बी. एच. २२८४) वरून वैरणीचा बिंडा घेऊन शेडवर आले. तो बिंडा सोडण्याच्या तयारीत असताना त्यांच्यावर अज्ञातांनी हल्ला चढवला. धारदार विळ्याने डोक्‍यावर, मानेवर, हातावर वर्मी घाव लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. आरडाओरडा झाल्याने महामार्गावरील प्रवाशांनी व वस्तीवरील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुनील काळे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसले. घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यास सुरुवातीला कोणीच पुढे आले नाही. सायंकाळी सहा वाजता खुनाची बातमी पसरली. खुनाची माहिती मिळताच कुरळप पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. काटे व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  

हल्लेखोर तीन ते चार जण असावेत

सुनील हे येलूर येथील शिवाजीनगर भागात राहायला आहेत. पत्नी वंदना, मुलगी साक्षी, मुलगा श्रीवर्धन, आई लक्ष्मी असा परिवार आहे. ते स्वतःची शेती सांभाळत शेतमजुरीचीही कामे करत होते. आज मजुरीचे काम करुन वैरण घेऊन महामार्गालगत असणाऱ्या शेडवरील जनावरांजवळ आले. गाडी उभी करुन वैरण उतरवण्याच्या तयारीत असतानाच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. दरम्यान, सुनील काळे यांचा खून अनैतिक संबंधातून झाला असावा तसेच हल्लेखोर तीन ते चार जण असावेत, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

Navodaya Vidyalaya Admission: नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाचे ऑनलाइन अर्ज सुरु; जाणून घ्या कसा आणि कुठे करावा

नमित मल्होत्रा यांच्या ‘रामायण' सिनेमाच्या टीझरची चर्चा; प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

SCROLL FOR NEXT