पश्चिम महाराष्ट्र

सेना आमदाराच्या तक्रारीवर एसपींचे 'हे' उत्तर

सकाळ वृत्तसेवा

सातारा : रस्त्यावरील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सातारा शहरात 24 तास बीट मार्शल योजना राबविण्यास प्रारंभ करण्यात आला. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखविण्यात आला. साताऱ्यात हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर 15 दिवसांनंतर तो जिल्हाभरात राबविला जाईल, असे सातपुते यांनी सांगितले.

हेही वाचा - कासची उंची महाविकासच्या हाती ; हवा 60 कोटी निधी
 
पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, ""सोनसाखळी, वाहनचोरी, घरफोड्या, मारामारी आदी रस्त्यांवर घडणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी, तसेच त्यातील संशयितांना तत्काळ पकडण्यासाठी ही योजना राबवत आहे. यामध्ये सात दुचाकी असतील. प्रत्येकी चार कर्मचारी नियुक्‍त केले आहेत. शिवाय, दोन कर्मचारी राखीव ठेवले आहेत. शहरातील ठरवून दिलेल्या ठिकाणी ते पेट्रोलिंग करतील. त्यांच्या दुचाकीवर सायरन बसविला आहे. त्यामुळे नागरिकांत सतर्कता वाढेल, तसेच चोरांमध्ये भीती निर्माण होईल.''
 
साताऱ्यात हा प्रयोग 15 दिवस प्रात्यक्षिक स्वरूपात राबवून त्यानंतर कऱ्हाड, फलटण, वाई यासह तालुका पोलिस ठाणे असलेल्या ठिकाणी राबविला जाणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी क्‍यूआर कोडची यंत्रणा उभारली आहे. त्याद्वारे संबंधित कर्मचारी कोठे पेट्रोलिंग करत आहेत, त्याची माहिती सॉफ्टवेअरला प्राप्त होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

"सीसीटीव्ही' प्रक्रियेमध्ये
 
शहरातील 53 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी दीड कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यातील काही निधी इतरत्र वर्ग करण्यात आल्याने या कामासाठी 25 लाखांचा निधी मिळाला आहे. त्यानंतर सीसीटीव्ही बसविण्यासाठी नव्याने ठिकाणे निश्‍चित करून तसा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला आहे. त्याला मान्यता मिळाल्यानंतर त्याबाबत कार्यवाही होईल, असे श्रीमती सातपुते यांनी सांगितले. 


त्यावर भाष्य योग्य नाही 

आमदार शंभूराज देसाई यांनी अधिवेशनात तुम्ही राजशिष्टाचार पाळत नसल्याची तक्रार केली आहे. या प्रश्‍नावर त्या म्हणाल्या, ""त्यावर भाष्य करणे योग्य नाही. वरिष्ठांकडून आदेश मिळतील. त्यानुसार कार्यवाही करू.''

अवश्य वाचा - पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुतेंवर कारवाई ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj and Uddhav Thackeray: "मोदींना विद्यार्थ्यांशी बोलायला कमीपणा वाटतो का?"; राज-उद्धवांचा सरकारवर घणाघात, 26 जुलैला मुंबईत मोर्चा

MSEDCL Officer Arrested : 2 हजारांची लाच महावितरण अधिकाऱ्याला पडली महाग! ACB ची भुसावळमध्ये धाड; अतिरिक्त कार्यकारी अभियंता अटकेत

Latest Marathi Update : 'सरकारने विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करू नये; हमी मिळाली तर आजच उपोषण सोडेन' – सोनम वांगचुक

Delhi Protest: आई, मला खूप मारलेय! दिल्लीतील आंदोलनात नागपूरच्या तरुणाईचा हुंकार; मारो सर, मारे असे म्हणत पोलिसांचा मार केला सहन

तंबाखू नियंत्रणाच्या नियमांत होणार मोठा बदल? FDAच्या निर्णयामुळे भारतात खळबळ, तज्ज्ञांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT