Jayant Patil vs MP Vishal Patil and MLA Vishwajeet Kadam esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Politics : 'मला टोकाला जायला लावू नका..'; जयंत पाटील समर्थकांची रील्स, खासदार अन् आमदार कदमांना इशारा

लोकसभेतील आखाडा गाजवल्यानंतर खासदार पाटील आणि माजी मंत्री विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांच्यामध्ये आत्मविश्‍वास आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

जयंत पाटील यांच्या समर्थकांनी समाजमाध्यमावर एक रील्स व्हायरल केली आहे. त्यात आमदार पाटील यांचा आवाज आणि काही क्लिप्स लावण्यात आल्या आहेत.

सांगली : ‘‘जयंत पाटलांचा (Jayant Patil) विरोध तुम्ही बघितलेला नाही, मला टोकाला जायला लावू नका,’’ असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या समर्थकांनी रील्सद्वारे खासदार विशाल पाटील (Vishal Patil) अन् आमदार विश्‍वजित कदम यांना दिला.

लोकसभेतील विजयानंतर इस्लामपूर मतदारसंघात (Islampur Constituency) जाऊन खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांनी वक्तव्य केल्यानंतर राजकारणात नव्या संघर्षाची ठिणगी पडली आहे. लोकसभेतील आखाडा गाजवल्यानंतर खासदार पाटील आणि माजी मंत्री विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांच्यामध्ये आत्मविश्‍वास आला आहे.

विशाल पाटील आणि कदम यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन अप्रत्यक्षपणे आव्हान दिलं आहे. विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी ललकारल्यानंतर जयंत पाटील यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांना इशारा दिला आहे.

‘रील्स’मध्ये काय आहे?

जयंत पाटील यांच्या समर्थकांनी समाजमाध्यमावर एक रील्स व्हायरल केला आहे. त्यात आमदार पाटील यांचा आवाज आणि काही क्लिप्स लावण्यात आल्या आहेत. यामध्ये ‘पाटील गोड बोलतात, पण जयंत पाटलांच्या विरोध तुम्ही अजून बघितलेला नाही. मला त्या टोकाला जायला लावू नका. आहे ते सगळंच गमवाल एवढंच सांगतो,’ असे रील्समध्ये म्हटले आहे.

विशाल पाटील, विश्वजित कदम काय म्हणाले?

‘यापुढं इस्लामपूर मतदारसंघात देखील आपलं लक्ष राहील आणि मतदारसंघात आता नवीन निर्णय घ्यावे लागतील,’ अशा शब्दांत विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम यांनी जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघातील कसबे डिग्रज येथे झालेल्या कार्यक्रमांत अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. खासदार पाटील म्हणाले, ‘विश्वजित कदम आघाडीत असल्यामुळे काही बोलू शकत नाही. मात्र मी अपक्ष खासदार असल्यामुळे काहीही करू शकतो. आपण दिल्लीत काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. मात्र अपक्ष खासदार म्हणून इस्लामपूर मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार आहे. या मतदारसंघातील सगळ्यांची मोट बांधण्याची जबाबदारी माझी आहे. सांगली लोकसभा मतदार संघातल्या गावांच्या सत्कार व्हायचा असताना तुमच्या गावातील सत्कार स्वीकारतो, यावरून तुम्ही ओळखलं पाहिजे की पुढची दिशा काय असणार आहे आणि काय राहिलं पाहिजे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Winter Session 2025: भीक मागण्यावर येणार बंदी! दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर, राज्य सरकारचं नेमकं धोरण काय?

Plane lands on moving car Video : भयानक दुर्घटना!, विमान थेट भरस्त्यावरील धावत्या कारवरच झालं लँड अन्..

Jowar Shengole Recipe: हिवाळ्यात बनवा पारंपरिक पद्धतीने गरमागरम ज्वारीच्या पिठाचे शेंगोळे!

Latest Marathi News Live Update : मुंबईतील दत्तक शाळांतील शिक्षकांच्या 'टीईटी' पात्रतेची होणार तपासणी!

Kannad Police Raid : कन्नडमध्ये मांजा विक्रेत्यावर पोलिसांचा छापा; एक ताब्यात; नायलॉन मांजा जप्त!

SCROLL FOR NEXT