Supriya-Sule 
पश्चिम महाराष्ट्र

हेलिकॉप्टरने फिरणाऱ्यांना सामान्यांचे प्रश्‍न समजत नाहीत - सुप्रिया सुळे

सकाळवृत्तसेवा

नगर - 'राज्यातील मंत्री हेलिकॉप्टमधून फिरतात. अशांना सर्वसामान्यांचे प्रश्‍न समजत नाहीत. त्यांना हेलिकॉप्टरमधून रस्त्यावरील खड्डे दिसत नाहीत. सामन्यांना मात्र जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील रस्तादुरुस्तीत लक्ष घालावे,'' असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्‍त केले. राष्ट्रवादी भवनात आज झालेल्या मेळाव्यानंतर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. त्या म्हणाल्या, 'नागरिकांचे प्रश्‍न जाणून घेण्यासाठी मी राज्यात दौरे करीत आहे. युवा संवादातून युवतींचे प्रश्‍न जाणून घेता येतात. कोणत्याही मागणीसाठी लढायचे असते. आत्महत्येमुळे प्रश्‍न सुटत नाहीत. आत्महत्या करणे चुकीचे आहे. आमच्या सरकारमध्ये एक आत्महत्या झाली, तरी सध्याचे मुख्यमंत्री त्या वेळी राज्य सरकारवर 302 कलम लावण्याची भाषा करीत होते. एक भ्रूणहत्या अथवा एका शेतकऱ्याची आत्महत्या झाली तरी सरकारचे ते अपयश असते, हे मी कबूल करते. राज्यातील आतापर्यंतच्या सर्वाधिक शेतकरी आत्महत्या गेल्या तीन वर्षांत झाल्या आहेत, असे सरकारी आकडेवारीच सांगते. मग आता कोणावर 302 कलम लावायचे?''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar : औद्योगिक क्षेत्रात दादागिरी कोणाची? आमदार रोहित पवार यांचा राज्य सरकारला प्रश्‍न

Mahadevi Elephant Video: महादेवी हत्तीने चिमुकल्याला वाचवलं? व्हिडिओ होतोय व्हायरल... सत्य काय?

Khadakwasla Dam : खडकवासल्यातून ४४ दिवसांत १२.६२ ‘टीएमसी’चा विसर्ग

Friendship Day 2025: मित्राला कधीही 'हे' 5 गिफ्ट देऊ नका, मैत्रीच्या नात्यात येऊ शकतो दुरावा

धक्कादायक! तीन मुलांच्या आईनं प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी पतीच्या हत्येचा रचला कट; मोबाईलमुळे लागला सुगावा अन्...

SCROLL FOR NEXT