पश्चिम महाराष्ट्र

Loksabha2019: 'आंबेडकरांच्या नातवाकडूनच राज्यघटनेचा खून करण्याचा प्रयत्न'

सकाळन्यूजनेटवर्क

पंढरपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाकडूनच भारतीय राज्यघटनेचा खून करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते सुशिलकुमार शिंदे यांनी केला आहे. धर्माच्या नावावर दंगे घडवून आणणाऱ्या एमआयएम सोबत निवडणूकीत युती करुन देशाची राज्यघटना लिहिणाऱ्या डॉं. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकरच राज्य घटनेचा खून करण्याचा प्रय़त्न करत असल्याचा सनसनाटी आरोप सुशिलकुमार यांनी केला.

हे आंबेडकरी जनतेचे हे दुर्दैव असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने आज पंढरपुरात संत तनपुरे महाराज मठात काँग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्त्याचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात निवडणूक संदर्भात मार्गदर्शन करताना शिंदे यांनी बहुजन वंचित विकास आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकरांवर चौफेर टिका केली. एक उमेदवार धर्माच्या नावावर साधुगिरी करु लागले आहेत तर दुसरे उमेदवार जातीयवादी एमआयएमसारख्या पक्षाला सोबत घेवून निवडणूका लढवत असल्याचे त्यांनी म्हटले.

डॉँ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील सर्वधर्मसमभाव टिकून राहण्यासाठी सलग तीन वर्षे अभ्यास करुन भारतीय राज्य घटना लिहीली त्याच डॉ. बाबासाहेबांचे नातू आज देशात जातीच्या नावावर अहंकार माजवणाऱ्या आणि अत्याचार करणाऱ्या एमआयएम सारख्या कट्टर जातीयवादी पक्षाला सोबत घेवून धर्माच्या आधारावर मत मागत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातूच आता राज्यघटनेच्या मुऴावर उठल्याची टिकाही शिंदे यांनी केला. यावेळी सभेला काँग्रेसचे आमदार भारत भालके, कल्याणराव काळे, प्रकाश पाटील उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश म्हस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Latest Marathi News Live Update : पुणे-बंगळुरू महामार्गावर मोठी कोंडी; पुण्याहून कोल्हापूरला जाणारी वाहतूक संथ गतीने

Abhijeet bhattacharya: "लग्नात गाणं गायल्यानं औकात कमी होते", म्हणणाऱ्या अभिजीत भट्टाचार्यांना गायकानं व्हिडीओ शेअर करत दिलं सडेतोड उत्तर

T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन; 'या' खेळाडूंना मिळणार अंतिम-11 मध्ये स्थान

Narendra Modi : काँग्रेसपासून सावध राहा ; लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत विरोधकांवर हल्ला

SCROLL FOR NEXT